Beating Retreat 2020: ... Beating Retreat Ceremony is 'Exclusive'
Beating Retreat 2020: ...म्हणून बीटिंग रिट्रीट सोहळा आहे 'खास' By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 10:40 PM2020-01-29T22:40:13+5:302020-01-29T22:45:23+5:30Join usJoin usNext देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनानंतर 29 जानेवारीला बीटिंग द रिट्रीटचं कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. रायसिना रोडवर राष्ट्रपती भवनासमोर याचं प्रदर्शन केलं जातं. चार दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची सांगता बीटिंग द रिट्रीटनं होते. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात Beating Retreatचा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो. लष्कराच्या सर्वच तुकड्यांनी यावेळी संचलन केलं आहे. राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इतर सरकारी इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बीटिंग रिट्रीटदरम्यान रायसीना हिलला तिरंग्यांच्या रोषणाईनं झगमगून टाकलं होतं. बीटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी विजय चौकमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. बीटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आला होता, तर काही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनीही रस्त्यांसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. कोणकोणते रस्ते बंद आहेत आणि कोणत्या रस्त्यांवरून वाहतूक वळवली आहे, याची माहिती पोलिसांकडून सामान्य नागरिकांना देण्यात आली होती. विजय चौकात पारंपरिक संगीतानं तिन्ही सेनांनी संचलन केलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम माथुर उपस्थित होते. Beating Retreat कार्यक्रमात सेनेचे बँड मार्च परत जात असताना 'सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा...' हे संगीत लावलं जातं. यावेळी उपस्थितांनी झेंड्याला वंदनही केलं.