‘Beating the Retreat’ ceremony 2019 at Attari-Wagah border
अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात संपन्न By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:17 PM2019-08-15T23:17:41+5:302019-08-15T23:22:42+5:30Join usJoin usNext अटारी-वाघा सीमेवर आज बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात पार पडला. बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते. कोणत्याही लढाईत सूर्यास्तानंतर सैनिक हत्यारे ठेवून आपापल्या कॅम्पमध्ये परततात. त्या वेळी एक संगीतमय समारंभाचे आयोजन केले जाते, यालाच ‘बीटिंग रिट्रीट’ असे म्हटले जाते. जगभरात ही परंपरा पाळली जाते. भारतात 1950पासून बीटिंग रिट्रीटची सुरुवात करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर बीटिंग द रिट्रीट सोहळ्यावर हल्ल्याचं सावट होतं. दरम्यान भारतात घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु हा सोहळा निर्विघ्नपणे मोठ्या उत्साहात पार पडला आहे. टॅग्स :स्वातंत्र्य दिनIndependence Day