CoronaVirus : लस नव्हे गंगाजल ठरू शकतो कोरोनावरील सर्वात स्वस्त उपचार, BHUच्या डॉक्टरांचा मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 01:26 PM 2021-07-02T13:26:19+5:30 2021-07-02T13:38:56+5:30
या याचिकेबरोबरच BHU आयएमएसच्या डॉक्टर्सनी एक वर्षापूर्वी केलेल्या दाव्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तसेच, डॉक्टर्सनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींकडे (PM Modi) गंगेच्या पाण्याच्या सायंटिफिक बॅकग्राउंडच्या तपासणीची परवाणगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (CoronaVirus) गंगेच्या पाण्याने (गंगाजल) कोरोनावरील उपचार शक्य आहे? गंगेच्या पाण्याने कोरोनावर उपचार करण्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे आणि न्यायालयाने यावरील सुनावणीसाठीही सहमती दर्शवली आहे. (UP BHU professor claim 1300 types of bacteriophages in ganga water for corona treatment) (प्रतिकात्मक फोटो)
या याचिकेबरोबरच BHU आयएमएसच्या डॉक्टर्सनी एक वर्षापूर्वी केलेल्या दाव्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तसेच, डॉक्टर्सनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींकडे (PM Modi) गंगेच्या पाण्याच्या सायंटिफिक बॅकग्राउंडच्या तपासणीची परवाणगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
ते म्हणाले, गंगाजल भलेही लस नसेल, पण कोरोना संक्रमणावरील सर्वात स्वस्त उपचार सिद्ध होऊ शकतो. BHUच्या डॉक्टर्सनी 2020 मध्ये दावा केला होता, की गंगेच्या पाण्यात आढळणाऱ्या बॅक्टिरियोफेजने कोरोना संक्रमणावरील उपचार शक्य आहे. मात्र, त्यावेळी ICMR ने त्यांचा दावा फेटाळला होता. (प्रतिकात्मक फोटो)
ICMRने म्हटले होते, की अशा प्रकारची कुठलीही क्लिनिकल स्टडी झालेली नाही, की ज्याच्या आधारे सांगितले जाऊ शकते, की गंगेच्या पाण्याने कोरोनावर उपचार केला जाऊ शकतो. मात्र, आता अलाहाबाद उच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देते, हे पाहावे लागेल. (प्रतिकात्मक फोटो)
कॉलरा महामारीच्या काळात झाले होते संशोधन - BHU च्या न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचे प्रो. विजय नाथ मिश्र यांनी म्हटले आहे, की 1896 मध्ये कॉलरा महामारीदरम्यान डॉ हॅकिंग यांनी एक स्टडी केली होती. यात, जे लोक गंगेच्या पाण्याचे सेवन करतात, त्यांना कॉलरा होत नाही, असे आढळून आले होते. (प्रतिकात्मक फोटो)
बीएचयूने दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासाकडे बराच काळ कुणीही लक्ष दिलेले नव्हते. ते म्हणाले, 1980 मध्ये समोर आले, की सर्वच नद्यांत बॅक्टिरियोफेज असतात. गंगेच्या पाण्यात असे 1300 प्रकारचे बॅक्टिरियोफेज आढळतात. (प्रतिकात्मक फोटो)
माध्यमांतील वृत्तानुसार, प्रा. गोपालनाथ यांनी 1980 ते 1990 दरम्यान BHU मध्ये बॅक्टिरियोफेजच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार केले होते. ज्या प्रकारे टीबीवरील उपचारासाठी बीसीजीचा वापर केला जातो. बीसीजी काही औषध नाही. हे एक लाइव्ह बॅक्टेरिया आहे. ज्याच्या सहाच्याने टीबीचा खात्मा केला जातो. (प्रतिकात्मक फोटो)
गंगेच्या पाण्याने कोरोनावरील उपचाराचा दावा - प्रोफेसर मिश्रा यांनी म्हटले आहे, की गंगा प्रकरणातील तज्ज्ञ अरुण गुप्ता यांनी राष्ट्रपतींना पत्र लहून गंगेच्या पाण्याचे औषधी गुणधर्म आणि बॅक्टेरियोफेजची माहिती मिळण्याचे आवाहन केले होते. गंगेच्या काठावर राहणारे 491 लोकांचे सर्वेक्षेण करण्यात आले होते. (प्रतिकात्मक फोटो)
यात, 274 लोक असे होते, जे रोज गंगेच्या पाण्यात अंघोळ करतात आणि गंगेचे पाणी पीतात. त्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती, असे निदर्शनास आले. (प्रतिकात्मक फोटो)
तर 217 लोक गंगेच्या पाण्याचा वापर करत नव्हते. यांपैकी 20 जणआंना कोरोनाची लागण झाली आणि 2 जणांचा मृत्यू झाला. ते म्हणाले गंगेच्या पाण्यावर आणखीही संशोधन करणे आवश्यक आहे. (प्रतिकात्मक फोटो)