big news for army manali leh road will be restored in a week vrd
लष्करासाठी गूड न्यूज! मनाली-लेह मार्ग तयार, आठवड्याभरात उघडला जाणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:23 PM2020-05-13T12:23:04+5:302020-05-13T12:28:39+5:30Join usJoin usNext रणनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला जवळपास 1100 किमी लांबीचा मनाली-लेह रस्ता लवकरच वाहतुकीसाठी पूर्ववत होणार आहे. यासाठी जवळपास एक आठवडा लागू शकेल. यंदा कोरोनामुळे पर्यटकांची रेलचेल बंद आहे. परंतु जर परिस्थिती सामान्य झाली, तर पर्यटकांना या मार्गाचा आनंददायक प्रवास अनुभवता येईल. बीआरओ कठोर परिश्रमानंतर मनाली-लेह मार्ग पूर्ववत करण्याच्या जवळपास पोहोचला आहे. बीआरओच्या लेह येथील हिमांक परियोजनेंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला आहे. मनाली येथील दीपक परियोजनेचे कर्मचारी दोन्ही बाजूच्या बरलाचा खिंडीतून बर्फ हटवण्याचं काम करत आहेत. मार्ग खुला केल्यानंतर सीमेवर तैनात सुरक्षा दलांपर्यंत पोहोचणे सहजशक्य होणार आहे. मनालीला पोहोचल्यावर पर्यटक 13050 फूट उंचीवर रोहतांग खिंड पाहता येणार आहे. येथून पुढे 16000 फूट उंच बरलाचा पास दिसू शकणार आहे. याखेरीज लेहच्या मैदानामध्ये गेल्यानंतर 16500 फूट उंच लाचुंगला खिंड ओलांडल्यानंतर तुम्हाला जगातील सुंदर 17½ फूट तांगलांगला पास दिसू शकेल. बीआरओ कमांडर कर्नल उमा शंकर म्हणाले की, त्यांनी यावेळी दोन्ही बाजूंनी बरलाचा खिंडाची चढाई केली आहे. हवामानानं साथ दिल्यास आठवड्याभरात ते पूर्ववत होईल. हा रस्ता खुला झाल्यानंतर पर्यटकांनाही याचा मनमुराद आनंद लुटता येईल.