Big rail accident that happened in the country in 2017
2017 मध्ये देशात झालेले मोठे रेल्वे अपघात By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 06:23 PM2017-08-23T18:23:27+5:302017-08-23T18:29:00+5:30Join usJoin usNext महाकौशल एक्सप्रेस अपघात, 30 मार्च 2017- उत्तर प्रदेशमध्ये महाकौशल एक्सप्रेसला 30 मार्च 2017 ला झालेल्या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले होते. महाकौशल एक्सप्रेस मध्य प्रदेशमधील जबलपूरपासून हजरत निजामुद्दीन, दिल्ली यादरम्यान धावते. कैफियत एक्स्प्रेस अपघात, 23 ऑगस्ट 2017 - उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा 23 ऑगस्ट 2017 ला अपघात झाला. एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले. उत्कल एक्सप्रेस अपघात 18 ऑगस्ट 2017 - उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात 18 ऑगस्ट 2017 रोजी पुरी-हरिद्वार-कलिंगा एक्सप्रेसचे 14 डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात 23 प्रवासी मृत्युमुखी पडले, तर 40 जण जखमी झाले. हिराखंड एक्स्प्रेस अपघात, 22 जानेवारी 2017 - जगदलपूर-भूवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला 22 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. टॅग्स :भारतीय रेल्वेअपघातIndian RailwayAccident