जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:50 PM 2018-12-11T15:50:42+5:30 2018-12-11T15:55:25+5:30
हिवाळा ऋतू सुरू झाला असून, उत्तर भारतात शीत लहरी वाहत आहेत.
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पर्वतराजीत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.
बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मोठी बर्फवृष्टी झाली आहे.
या बर्फवृष्टीनं रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे.
बर्फवृष्टीचं चित्र नयनरम्य असलं तरी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे.
या बर्फवृष्टीनं पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना हॉटेलमध्ये बसूनच दिवस काढावे लागत आहेत.
काश्मीर खोऱ्यातून जम्मूकडे येणारी रस्ते वाहतूक ठप्प झाली असून विमानसेवेलाही फटका बसला आहे.
श्रीनगर-जम्मू राज्य महामार्ग बंद झाला. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह आणि मुघल मार्ग बंद करण्यात आला आहे.