बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; सूर्याच्या पृष्ठभागावर ४ वर्षातील सर्वात मोठा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 10:39 AM2023-01-07T10:39:37+5:302023-01-07T10:46:35+5:30

आपल्या विशाल सौरमालेतील ऊर्जेचा एकमेव स्त्रोत सूर्य आहे. अलीकडे, गेल्या चार वर्षांतील सूर्याच्या पृष्ठभागावर सर्वात मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट "एआर 2838" नावाच्या सनस्पॉटवरून आला असल्याचं स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने सांगितले.

AR 2838 हा आतापर्यंतचा चार वर्षांतील सर्वात मोठा सोलर फ्लेअर स्फोट असल्याचं मानले जाते. हे अधिकृतपणे X1.5 श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. याकडे नवीन सौरचक्र म्हणून पाहिले जात आहे. सूर्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला सनस्पॉट होते.

येत्या काही आठवड्यांत सनस्पॉट सूर्यापासून दूर जाण्याचीही शक्यता आहे. हा सनस्पॉट काही काळ त्याच्या जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. अटलांटिक महासागरावरील शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउटमुळे पृथ्वीवर सौर स्फोट झाल्याचे परिणाम जाणवले.

सोलर फ्लेअर्स मशिनींचे नुकसान करण्यासाठी आणि पृथ्वीवरील विद्युत् प्रवाहाचा प्रसार रोखण्यासाठी जबाबदार आहेत. रिपोर्टनुसार, सौर स्फोटाच्या उद्रेकामुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात वरच्या थराचे आयनीकरण झाले, ज्यामुळे विद्युत् प्रवाह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ६०-१०० किमी दरम्यान वाहू लागला. परिणामी, पृथ्वीचे ध्रुवीय चुंबकीय क्षेत्र बदलले.

सोलर फ्लेअर्स हे सूर्याच्या पृष्ठभागावर खूप वेगाने होणारे स्फोट आहेत, जे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्यानंतर उद्भवतात. स्फोट होताना, किरणोत्सर्ग ब्रह्मांडात सोडला जातो, ज्याचा थेट परिणाम आपल्या सौर मंडळाच्या ग्रहांवर होतो.

या किरणांमध्ये रेडिओ लहरी, क्ष-किरण आणि गॅमा किरणांचा समावेश होतो. नासाचा दावा आहे की, या स्फोटातून सोडलेली ऊर्जा १०० मेगाटनच्या लाखो हायड्रोजन बॉम्बच्या एकाचवेळी स्फोटाइतकी आहे. तरीही, हे सूर्याच्या एकूण ऊर्जेच्या केवळ एक दशांश आहे.

सोलार फ्लेअर्स पृथ्वीच्या दिशेने आल्यास त्याचा चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. यामुळे रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर, ग्रिड्स, GPS वर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत अंतराळयानालाही धोका पोहचू शकतो.

बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्याणीनुसार, २०२३ मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडेल आणि एक सौर वादळ येऊ शकते, ज्याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीची कक्षा बदलू शकते. या दिव्य घटनेचे इतरही अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात, जे ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण होईल.

गेल्या ४ वर्षातील AR 2838 हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट झाला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर झालेल्या या स्फोटामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्याचं बोललं जात आहे.

बाबा वेंगा यांनी ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि ब्रेक्सिट सह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्या खऱ्याही ठरल्या होत्या. २०२३ संदर्भात बोलताना त्यांनी हे वर्ष अंध:कारमय आणि संकटमय असेल अशी भविष्यवाणी ही केली आहे. त्यामुळे वेंगा यांची पहिली भविष्यवाणी खरी ठरली, आता इतर खऱ्या ठरणार का हे आगामी काळात कळेल.