Bihar election Know about pushpam priya chowdhary plurals party CM candidat
मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 09:14 PM2020-09-14T21:14:12+5:302020-09-14T21:49:32+5:30Join usJoin usNext सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबरकसून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या धामधुमीतच एका बॅक ड्रेसवाल्या मुलीचा फोटो बिहारच्या जनतेत जबरदस्त व्हायरल होत आहे. संपूर्ण बिहारमध्येच नाही तर देशातही सध्या या मुलीची चर्चा सुरू आहे. या मुलीचं नाव आहे, पुष्पम प्रिया चौधरी. चला, तर जाणून घेऊया कोण आहे पुष्पम प्रिया चौधरी? एक दिवस वृत्तपत्रांत बिहारच्या पुष्पम प्रिया चौधरींचे नाव अचानक हेडलाईनमध्ये झळकले आणि बघता बघता लोक त्यांना सोशल मीडियावरही शोधू लागले. पुष्पम प्रिया चौधरी यांच्याबद्दल सांगायचे, तर त्यांनी स्वतःच आपली वेबसाइट www.plurals.org वर सांगितले आहे, की बिहारच्या राजकारणात उतरून त्यांना कशाप्रकारे बिहार अधिक चांगला बनवायचा आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात पुष्पम यांचे बालपण गेले आहे. पुष्पम यांचे म्हणणे आहे, की त्यांनी प्ल्यूरल्स पार्टी तयार करून, तिच्या माध्यमाने 2020 मध्ये 'सर्वांचे सरकार' या आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुष्पम 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी बिहार बाहेर गेल्या होत्या. त्यांनी इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या इंस्टिट्यूट ऑफ डिव्हलपमेंट स्टडीजमध्ये पोस्टग्रॅज्यूएशन केले आहे. पुष्पम यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स विषयात मास्टर ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्येही पोस्टग्रॅज्यूएशन केले. बिहारमध्ये 2018 आणि 2019 मध्ये एंसेफलायटिस तापामुळे शेकडो मुलांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्तांमुळे त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला.... ...तेव्हा त्या विकसित लोकशाहीसाठी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि एलएसईच्या पब्लिक-पॉलिसीसंदर्भातील एका प्रॉजेक्टवर काम करत होत्या. यावेळी त्यांच्या मनात विचार आला, की आपल्या राज्यातील समस्या माहित असूनही, दुसऱ्या विकसित देशांसाठी काम करणे अनैतिक आहे. यानंतर त्या बिहारच्या राजकारणात आल्या. भारतात येताच पुष्पम यांनी प्ल्यूरल्स पार्टीची स्थापना केली. त्या स्वतःच या पार्टीच्या अध्यक्ष आहेत. पुष्पम यांचे वडील विनोद चौधरी जनता दल (यूनायटेड)चे नेते आणि विधान परिषद सदस्य होते. पंख असलेला 'पाढरा घोडा', हा पुष्पम यांच्या पार्टीचा लोगो आहे. या घोड्याला शक्ती आणि तीव्रतेचे प्रतीक मानण्यात आले आहे. 'जन गण सबका शासन', ही पुष्पम यांच्या पक्षाची घोषणा आहे. त्या स्वतःच आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहेत. आपण राजकारणात बदल घडवण्यासाठी आलो आहोत, असे पुष्पण यांचे म्हणणे आहे. प्रत्येक विधानसभा जागेवर त्यांचा पक्ष उमेदवार उतरवणार आहे. जाती, धर्माच्या राजकारणाला मुठमाती देऊन आपला पक्ष राज्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करेल. तसेच समाजातील वंचित घटकांनाही मुख्य प्रवाहात आनेल, असे पुष्पम यांनी म्हटले आहे. पुष्पम प्रिया चौधरी या आपल्या भागात नेहमीच काळ्या कपड्यांवरच दिसतात. पुष्पम प्रिया चौधरी मास्कपासून ते चप्पलपर्यंत आणि घड्याळापासून ते मोबाईलपर्यंत सर्व गोष्टी काळ्या रंगाच्याच वापरतात. पुष्पम यांना, त्याच्या या ड्रेस कोडवरून अनेकदा प्रश्नही विचारले जातात. एका पत्रकाराने पुष्पम प्रिया चौधरी यांना नुकताच, आपण नेहमी काळ्या रंगाचा ड्रेसच का परिधान करता, असा प्रश्न विचारला होता. यावर नेते मंडळी पांढरे कपडेच का परिधान करतात, असे उत्तर त्यांनी दिले होते. सर्व फोटो पुष्पम प्रिया चौधरी यांचे फेसबुक पेज/सोशल मीडिया.टॅग्स :बिहारनिवडणूकभारतBiharElectionIndia