बिहारच्या राजकारणात होणार नवी एंट्री, लालूंच्या घरातील 'एअरहोस्टेस' टेक-ऑफच्या तयारीत By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 12:57 PM 2024-02-09T12:57:04+5:30 2024-02-09T13:10:14+5:30
या महिलेला थेट राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा, कोण आहे 'ती'? Rajshree Yadav in Bihar Politics: बिहारच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठी घडामोड घडली. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांचे महागठबंधन तोडून भाजपाप्रणित NDA सोबत सरकार स्थापन केले.
भाजपाने बिहारमध्ये विधानसभेच्या जास्त जागा जिंकलेल्या असूनही नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावर कायम राहता आले. पण या नितीश-भाजपा युतीनंतर लालू यांचा राष्ट्रीय जनता दल पक्षाने नवी रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे.
याच रणनीतिचा भाग म्हणून आता बिहारच्या राजकारणात नवी एंट्री होण्याची चर्चा आहे. लालू प्रसाद यादव यांच्या घरातील आधी एअरहोस्टोस असलेल्या एका महिलेला सध्या थेट लालूंच्या पक्षाकडून राज्यसभेचे तिकीट मिळू शकते. जाणून घेऊया कोण आहे ती महिला?
राज्यसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांची सून आणि तेजस्वी यांच्या पत्नी राजश्री बिहारच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. लालू यांचा पक्ष राजश्री यांना लाँच करण्याच्या तयारीत आहे.
पत्नी आणि मुलीनंतर लालू यादव आता आपल्या सुनेला राजकीय क्षेत्रात उतरवण्याच्या तयारीत आहेत. राजदच्या कोट्यातून राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होत आहेत. यातील एका जागेवर राजश्री यादव यांना तिकीट दिले जाऊ शकते.
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांचा विवाह राजश्रीसोबत २०२१मध्ये झाला. राजश्रीचे आधीचे नाव रॅचेल गुदिन्हो होते. लग्नानंतर तिचे नाव बदलून राजश्री ठेवण्यात आले.
राजश्री हरयाणातील रेवाडी येथील ख्रिश्चन कुटुंबातील असून ती लहानपणापासूनच दिल्लीत राहत होती. तेजस्वी यादव आणि राजश्री यांनी नवी दिल्लीतील आरके पुरम येथील डीपीएस शाळेत एकत्र शिक्षण घेतले.
राजश्री लग्नापूर्वी एअरहोस्टेस म्हणून काम करत होती. राजश्रीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता राजश्री राजकारणात एन्ट्री घेत असल्याच्या चर्चा आहेत.