Bipin Rawat Untold Stories: बिपीन रावत डिसेंबरमध्येच देशसेवेत रुजू झालेले... लष्कर प्रमुख, सीडीएस सारे काही... वाचा तेजतर्रार अधिकाऱ्याच्या न ऐकलेल्या गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:03 PM 2021-12-08T18:03:03+5:30 2021-12-08T18:38:15+5:30
Bipin Rawat Helicopter Crash: तसे पहायला गेले तर हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या खालोखाल असलेले पद. भारताची तिन्ही संरक्षण दले ही राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली असतात. राष्ट्रपती या दलांचे प्रमुख असतात. त्यानंतर बिपीन रावत हे या दलांचे प्रमुख बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) हे नवे पद तयार करण्याची ती घोषणा होती. त्यानंतर कॅबिनेटने सीडीएस पद बनविण्यासाठी मंजुरी दिली. माजी लष्कर प्रमुख झालेल्या बिपीन रावतांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावत हे तिन्ही संरक्षण दलांना एकत्रित सांधणारे अधिकारी बनले होते.
तसे पहायला गेले तर हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या खालोखाल असलेले पद. भारताची तिन्ही संरक्षण दले ही राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली असतात. राष्ट्रपती या दलांचे प्रमुख असतात. त्यानंतर बिपीन रावत हे या दलांचे प्रमुख बनले होते. रावत हे अतिशय आक्रमक, काऊंटर अॅटॅक आणि उंचीवरील लढायांसाठी निष्णात आहेत.
बिपीन रावत यांचे वडील देखील लष्करी सेवेत होते. लेफ्टनंट जनरल लक्ष्मण सिंह रावत असे त्यांचे नाव होते. मद्रास यूनिवर्सिटी से डिफेंस सर्विसेजमधून बिपीन रावत यांनी एमफील केले आहे. यानंतर ते अमेरिकेला गेले होते. तेथे त्यांनी शिक्षण पुढे सुरु ठेवले. सर्विस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी ग्रॅज्युएट करून हाय कमांड कोर्स देखील केला. यानंतर ते भारतात परतले आणि देशाच्या सेवेत येण्याचा निर्णय घेतला.
डिसेंबरशी खास कनेक्शन रावत यांना 16 डिसेंबर, 1978 मध्ये यश आले. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5 व्या बटालियनमध्ये सहभागी करण्यात आले. ही त्यांच्या वडिलांचीच युनिट होती. 31 डिसेंबर 2016 मध्ये ते लष्कर प्रमुख झाले होते. तर 31 डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी सीडीएस पदाची जबाबदारी स्वीकारली होती.
सुरुवातीपासूनच रावत यांना अशांत भागांत काम करण्याचा अनुभव मिळाला. भारतीय सैन्यातील वेगवेगळी आव्हाने, उत्तरेकडील लष्करी दलांचे पुनर्गठन, पश्चिमेकडी दहशतवाद आणि प्रॉक्सी वॉर, पुर्वोत्तर मध्ये सुरु असलेला संघर्ष आदी आव्हाने त्यांनी पेलली. 37 वर्षे देशाची सेवा केली.
उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये रावत यांचा जन्म झाला होता. रावत हे लष्कर प्रमुख बनले तेव्हा देखील दोन लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी आणइ पीएम हारिज यांच्या सेवाज्येष्ठतेला डावलण्यात आले होते. गोरखा रेजिमेंटमधून आलेले ते पाचवे असे अधिकारी होते, जे भारतीय सैन्याचे प्रमुख बनले. 1987 मध्ये रावत यांची बटालियन चीनी सैन्याविरोधात उभी ठाकली होती.
37 वर्षे देशाची सेवा.. बिपीन रावत यांनी आयुष्याची 37 वर्षे देशसेवेसाठी दिली आहेत. त्यांचे लग्न मधुलिका यांच्याशी झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. रावत यांना विशेष सेना मेडल आणि युद्ध सेना मेडल मिळाले आहे. रावत यांनी भारतीय राजकारणावर देखील भाष्य करणारे लेख लिहिले आहेत.
7000 लोकांचा जीव वाचवला रावत यांनी केवळ भारताचीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सेवा केली आहे. ते कांगोतील युएनच्या एका मिशनचे भाग होते. तेव्हा एक मोठी घटना घडली होती. रावत यांनी मुत्सद्दीपणे आणि सतर्कतेने 7000 लोकांचा जीव वाचला होता.