बर्थडे स्पेशल; या फोटोंमधून दिसतो रतन टाटा यांचा साधेपणा, यशाच्या शिखरावर असूनही पाय आहेत जमिनीवर By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 01:59 PM 2021-12-28T13:59:46+5:30 2021-12-28T14:05:47+5:30
रतन टाटा 1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी समूहाचे अध्यक्षपद सोडले पण, अजूनही ते टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवणे सर्वात अवघड गोष्ट आहे. पण, रतन टाटा ही अशी व्यक्ती आहे, ज्यांच्या साधेपणामुळे त्यांना माणणारा वर्ग मोठा आहे.
रतन टाटा यांना ओळखत नाही, असा क्वचितच कुणी असेल. त्यांच्याबद्दलच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच. 1991 ते 2012 पर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी समूहाचे अध्यक्षपद सोडले.
तुम्हाला या गोष्टी माहीत असतील, पण तुम्हाला त्यांच्या साधेपणाची झलक त्यांच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळेल. आज त्यावर एक नजर टाकूया.
जेव्हा रतन टाटा इंस्टाग्रामवर आले, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, मी खूप उत्साही आहे. मला या माध्यमातून अनेकापर्यंत माझ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत.
रतन टाटा यांचे त्यांच्या 'टिटो' नावाच्या कुत्र्यावर खूप प्रेम होते. तो आता जगात नाही. टिटोच्या प्रेमासाठी त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. फोटोमध्ये ते टिटोसोबत दिसत आहे.
रतन टाटा यांच्या या फोटोने लोकांची मने जिंकली होती. त्यांनी त्यांच्या तरुणवणाचा फोटो शेअर केला होता. तेव्हा ते लॉस एंजेलिसमध्ये शिक्षण घेत होते. फोटो पाहून अनेकांना त्यांना हॉलिवूडचा हिरो दिसत असल्याची कमेंट केली होती.
इंस्टाग्रामवर एका तरुणीने त्यांना 'छोटू' म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर यूजर्स महिलेवर संतापले आणि त्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पण, टाटांनी महिलेच्या कमेंटला प्रतिसाद देत तिला पाठिंबा दिला आणि इतरांना तिच्याशी चांगले वागण्यास सांगितले.
केरळमधील मल्लपुरममध्ये गर्भवती हत्तीणीच्या वेदनादायक मृत्यूने संपूर्ण जग हादरले. गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते. रतन टाटा यांनी त्या हत्तीसाठी एक पोस्ट लिहिली होती.
रतन टाटा यांनी शालेय दिवसातील फोटोही इंस्टावर शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या.
टाटा यांनी आपले गुरू जेआरडी टाटा यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमधून त्यांनी त्यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.