गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश, दिल्लीत जोरदार जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:23 IST2017-12-18T15:17:15+5:302017-12-18T15:23:33+5:30

केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे.

भाजपाच्या विजयाचा जल्लोष सगळीकडेच होतो आहे.

नवी दिल्लीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गरबा खेळून आनंद साजरा केला.