black fungus patient admitted to sn medical college second time Operation done
चिंताजनक! दोनदा ऑपरेशन करूनही Black Fungus चा धोका; डॉक्टरही झाले हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:43 PM2021-08-04T16:43:20+5:302021-08-04T17:00:19+5:30Join usJoin usNext Black Fungus : देशातील अनेक राज्यांत Black Fungus चा धोका वाढला आहे. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच ब्लॅक फंगसने देखील थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांत Black Fungus चा धोका वाढला आहे. "म्युकोरमायकोसिस" असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगसने (Black Fungus) विळखा घातला आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत दोनदा ऑपरेशन केलं तरी ब्लॅक फंगसचे रुग्ण बरे होत नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ब्लॅक फंगस वॉर्डमध्ये अशाच आणखी एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ब्लॅक फंगस वॉर्डचे प्रमुख डॉ. अखिल प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 72 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एका आठवड्यांनी त्यांच्यात ब्लॅक फंगसची काही लक्षणं आढळून आली, ब्लॅक फंगसची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यत आले. त्यांचं दोन वेळा ऑपरेशन झालं आहे. मात्र पुन्हा उपचारासाठी ते आता रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णाच्या घशामध्ये आणि नाकात फंगस आढळून आले आहे. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये 11 जिल्ह्यांतील ब्लॅक फंगसचे 99 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्लॅक फंगसमुळे 9 जणांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. तर काहींचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. तर काही रुग्णांना दुसऱ्यांदा ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे त्यांच्यामध्ये लक्षणं आढळून आलेली नाहीत. रुग्णांच्या एमआरआयमध्ये मात्र फंगसची लागण झाल्याचं दिसून येत आहे. अनेक रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून काहींना अँटी फंगल औषध दिलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना चाचणीसाठी वारंवार स्वॅब सँपल घेतल्याने Black Fungus चा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. दिल्लीतील एम्समध्ये याबाबत एक रिसर्च करण्यात आला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सँपल घेताना स्वॅब स्टिक नाकात फिरवल्यानंतर फंगस आणि बॅक्टेरियाला शरीरात शिरण्यापासून रोखणाऱी नेसल म्यूकोसाला धक्का बसतो. त्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका हा अधिक वाढत आहे. एम्सचे मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रोफेसर नवीत विग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रिसर्चमध्ये 352 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामधील 152 रुग्ण हे कोरोनासोबतच ब्लॅक फंगसचे होते. रुग्णालयातील 352 मधील 230 रुग्णांचं दोनदा चाचणीसाठी सँपल घेण्यात आले होते. 230 मधील 116 ब्लॅक फंगसचे रुग्ण होते आणि त्यांची दोनहून अधिक वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. नेसल म्यूकोसाला इजा पोहचल्यामुळे रोगप्रतिरोधक क्षमता कमी होते. ज्यामुळे हवेत असलेले फंगस हे अत्यंत सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळेच इतरही आजाराचा धोका वाढतो. डॉक्टरांनी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची सातत्याने कोरोना चाचणी करू नये असं म्हटलं आहे. रिसर्चमध्ये मधुमेह असलेल्य रुग्णांना ब्लॅक फंगसचा अधिक धोका असल्याचं म्हटलं आहे. रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे. टॅग्स :म्युकोरमायकोसिसभारतहॉस्पिटलडॉक्टरMucormycosisIndiahospitaldoctor