black wheat changes fortunes of madhya pradesh farmer becoming millionaire
काळ्या गव्हाची कमाल; लाखोंच्या कमाईमुळे शेतकरी मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 10:55 AM2020-06-13T10:55:55+5:302020-06-13T11:11:19+5:30Join usJoin usNext शेतकरी मातीतून सोनं पिकवतो, असं म्हणतात. मात्र अनेकदा जगाच्या पोशिंद्यावरच अन्याय होतो. त्याच्या पिकाला योग्य भावच मिळत नाही. परंपारिक शेती पद्धतीमुळे अनेकदा शेतकरी अडचणीत येतो. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो. मध्य प्रदेशच्या एका शेतकऱ्यानं हटके शेती केली आहे. त्याला खर्चाच्या चौपट दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याचं नशीबच पालटलं आहे. धार जिल्ह्यातल्या सिरसौदामधील शेतकरी विनोद चौहान यांनी काळा गहू लावला. काळा गहू अतिशय दुर्मिळ समजला जातो. त्यामुळे चौहान यांनी लावलेल्या गव्हाला मोठी मागणी आहे. विनोद चौहान यांनी ५ क्विंटल गहू लावला होता. त्यातून २०० क्विंटल गव्हाचं उत्पादन आलं. काळा गहू अतिशय पौष्टिक असतो. यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. मधुमेह, रक्तदाब, कर्करोगाचा सामना करणाऱ्यांसाठी हा गहू उत्तम समजला जातो. काळा गहू लावण्यासाठी चौहान यांना २५ रुपये जास्त खर्च करावे लागले. त्यांनी साधारण गहू लावला असता, तर त्यांचे २५ हजार रुपये वाचले असते. मात्र चौहान यांनी जोखीम पत्करली. काळ्या गव्हात अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळेच त्यांच्या गव्हाला मोठी मागणी आहे. विनोद चौहान यांच्या यशोगाथा ऐकून अनेकांनी त्यांना संपर्क केला. जवळपास १२ राज्यांतील शेतकऱ्यांनी त्यांना फोन करून काळा गहू लावण्याची इच्छा व्यक्त केली. साधारण गव्हाला क्विंटलमागे २ हजार रुपयांचा दर मिळतो. तर काळ्या गव्हाला प्रति क्विंटलमागे ७ ते ८ हजार दर मिळतो. काळ्या गव्हाची चव शरबती गव्हासारखीच असते. मात्र तो मधुमेहींसाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे त्याला मोठी मागणी आहे.