Bride makes fool and marries 3 grooms in jharkhand Gujrat and Maharashtra
लुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 09:21 PM2020-08-07T21:21:05+5:302020-08-07T21:30:43+5:30Join usJoin usNext झारखंडच्या चतरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील इटखोरी येथे राहणाऱ्या प्रियंका कुमारीवर शादी डॉट कॉमच्या माध्यमाने एक नाही तर तब्बल तीन जणांना लुटल्याचा आणि परदेशात पळून जाण्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियंका एवढी लबाड होती, की तिने वेगवेगळ्या राज्यांतील युवकांना आपल्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांना गंडवले. सांगण्यात येते, की प्रियंका शादी डॉट कॉमच्या माध्यमातून सर्वप्रथम गिरिडीहच्या निलय कुमार नामक तरुणाच्या संपर्कात आली. यानंतर त्याच्यासोबत रांचीयेथे लग्न केले. दोन वर्षांनंतर निलय आणि प्रियंका यांच्यात भांडण व्हायला लागले. याच दरम्यान प्रियंकाने निलयकडून एक कोटी रुपये लुटले आणि गायब झाली. काही दिवसांनंतर प्रियंकाने पुन्हा शादी डॉट कॉमवर स्वतःला अविवाहित दाखवून गुजरातमधील राजकोट येथील अमित मोदी नावाच्या युवकाशी लग्न केले आणि त्याच्यासोबत राहू लागली. याच दरम्यान तिने कुटुंबात आर्थिक चंचण असल्याचे सांगत, अमित यांच्याकडून तब्बल 40 ते 45 लाख रुपये घेतले. अमित मोदीसोबत काही महिने राहिल्यानंतर, प्रियंकाने अमितला सांगितले, की तिच्या बहिणीला दिल्ली येथे घरी शिफ्ट करायचे आहे. यासाठी तिला दिल्ली येथे जावे लागेल. यानंतर प्रियंका दिल्लीला जाण्याचे सांगून जे घरातून बाहेर पडली, ती परत आलीच नाही. यानंतर, अमितला समजले, की 29 डिसेंबर 2018 रोजी प्रियंकाने पुण्यातील सुमित दशरथ पवार नावाच्या तरुणाशी लग्न केले आहे आणि ती त्याच्यासोबत कॅलिफोर्नियाला गेली आहे. जेव्हा सुमितच्या आईने प्रियंकाच्या मोबाईलवर अमितचा कॉल पाहिला. अमितसोबत प्रियंकाचे फोटो पाहिले. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा फुगा फुटला. यानंतर सुमितच्या आईने अमितला फोन लावला आणि प्रियंकासंदर्भात चौकशी केली. यानंतर सत्य काय ते समोर आले. यानंतर त्यांनी पुणे पुलिसात तक्रार दाखल केली आणि चौकशीला सुरुवात झाली. यानंतर प्रियंकाचे धागे राजकोट आणि चतरा जिल्ह्यात आढळून आले. इटखोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी याप्रकरणी चतरा पोलिसांना चौकशी करायला सांगितली आहे. याशिवाय पासपोर्ट ऑफिसला चुकीची माहिती दिल्याचा आरोपही प्रियंकावर असून त्याचीही चौकशी होत आहे.टॅग्स :गुन्हेगारीचोरीलग्नझारखंडगुजरातमहाराष्ट्रपुणेCrime NewsRobberymarriageJharkhandGujaratMaharashtraPune