ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह भारतात पोहोचताच 'देसी लूकमध्ये' दिसले, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 11:33 PM 2023-09-08T23:33:35+5:30 2023-09-08T23:38:03+5:30
G20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दिल्लीत आले आहेत. G20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक नवी दिल्लीत अतिशय मस्त स्टाईलमध्ये दिसले.
G20 बैठकीसाठी भारतात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नवी दिल्लीतील ब्रिटिश कौन्सिलच्या मुख्यालयात स्थानिक शाळेतील काही मुलांची भेट घेतली. ऋषी सुनक यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षताही उपस्थित होती.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही नवी दिल्लीत मुलांना भेटताना खूप आनंदी दिसल्या. त्यांनी मुलांशी खूप गप्पा मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
नवी दिल्लीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीने आणखी काही लोकांची भेट घेतली. तसेच लोकांसोबत फोटो काढाले.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्तीही ब्रिटीश कौन्सिलमध्ये पोहोचल्यानंतर लॉबीमध्ये फुटबॉल खेळताना दिसल्या.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही त्यांची पत्नी अक्षतासोबत मध्य दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात फिरायला गेले होते.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक जी-२० शिखर संमेलनाच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी पोहचले आहेत. भारतात आल्यानंतर सुनक यांनी खलिस्तान मुद्दा, रशिया-यूक्रेन युद्धात भारताची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
मी एक हिंदू आहे, भारतातील माझ्या दौऱ्यात मी येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. माझ्यावर तेच संस्कार झालेत. भारतात आल्यानंतर मला मंदिरातही जाता येईल अशी अपेक्षा आहे. अलीकडेच मी आणि माझ्या कुटुंबाने रक्षाबंधन साजरी केली.