अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एका निवांतक्षणी टिपलेला त्यांचा फोटो.अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला निराश केले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५२ अंकांच्या घसरणीसह २३००२ वर बंद झाला.तर निफ्टीतही ४३ अंकांची घसरण होऊन ६ ९८७ अंकांवर बंद झाला.प्रत्येक स्वयंपाकघर धूरमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी गरीबातल्या गरीब घरामध्ये एलपीजी सिलिंडर कनेक्शन देण्यात येणार असून सुरुवातीला २००० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.औष्णिक विजेसारख्या पारंपरिक स्रोतांना असलेल्या मर्यादांचा विचार करून अणुऊर्जा निर्मितीसाठी पुढच्या १५ ते २० वर्षांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केला आहे.यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या निधीत केवळ ४.८ टक्के इतकीच वाढ झाल्याचे दिसते.सरकारने गरजुंसाठी सुरु केलेल्या सुविधांचा फायदा त्यांना घेता यावा यासाठी सरकार आधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार आहे.भारतात सलग पाचव्यावर्षी सिगारेटच्या किंमती वाढणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये सर्व तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन शुल्क दरात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. फक्त बिडीवरील उत्पादन शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही.कृषी क्षेत्र आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी ३५९८४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. अर्थसंकल्पामध्ये फक्त सिंचनासाठी नाबार्ड अंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे.जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे वित्तीय बाजारपेठेत घसरण सुरु आहे मात्र या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे असे सुरुवातीलाच सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी (दि.२९) २०१६-१७ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.