Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा?

By प्रविण मरगळे | Published: February 1, 2021 02:32 PM2021-02-01T14:32:35+5:302021-02-01T14:47:33+5:30

प्रत्येक देशाला स्वत: चे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके आपल्या लोकसंख्येस इतर मूलभूत सुविधा पुरविल्या जाणे. जगातील प्रत्येक देश आपली सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे करतो. सीमा सुरक्षेसाठी सैन्य, नौदल आणि हवाई दल तैनात आहेत, तर पोलिस अंतर्गत सुरक्षेसाठी तैनात आहेत.

देशांना संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. यासाठी प्रत्येक देश आपले संरक्षण बजेट निश्चित करतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) संपूर्ण जगाच्या लष्करी अर्थसंकल्पात होणाऱ्या बदलांवर देखरेख करते, त्यानुसार २०१९ मध्ये संपूर्ण जगाचं संरक्षण बजेट १९१७ अब्ज डॉलर होते. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ६.६ टक्के जास्त होते. संरक्षण बजेटच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या ५ देशांमध्ये आहे.

अमेरिकाः संरक्षण बजेटच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये त्यांनी संरक्षण बजेटवर ७३२ अब्ज डॉलर्स खर्च केले. अमेरिकेने आपल्या जीडीपीच्या ३.४ टक्के संरक्षणावर खर्च केला आहे. अमेरिका हे जगातील सर्वात मोठे शस्त्रे उत्पादक देश आहे. शस्त्रांचा अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे.

चीनः दुसर्‍या क्रमांकावर शेजारील राष्ट्र चीन आहे, ज्यांचे संरक्षण बजेट २६१ अब्ज डॉलर्स होते. चीनने जीडीपीचा १.९ टक्के हिस्सा आपल्या सुरक्षेवर खर्च केला. भारताशी स्पर्धेत वाढ होत असल्यामुळे चीनने शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू केली आहे.

भारतः संरक्षण बजेटच्या बाबतीत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. देशाचे संरक्षण बजेट ७१.१ अब्ज डॉलर्स होते. पाकिस्तान आणि चीनशी सामोरे जाण्यासाठी भारत आपल्या जीडीपीचा २.४ टक्के हिस्सा संरक्षणावर खर्च करतो. भारताला आपल्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांचे संरक्षण करावे लागेल

रशियाः ६५.१ अब्ज डॉलर्स खर्च करून संरक्षण बजेटच्या बाबतीत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. रशियाचे संरक्षण बजेट त्याच्या जीडीपीच्या ३.९ टक्के होते. अमेरिकेबरोबरच्या तणावामुळे रशिया आपल्या संरक्षण बजेटवर जास्त खर्च करते.

सौदी अरेबिया: त्यांनी जीडीपीच्या ८ टक्के संरक्षण बजेटवर खर्च केले. सौदी अरेबियाचे संरक्षण बजेट ६१.९ बिलियन डॉलर्स होते आणि ते पाचव्या क्रमांकावर आहे. जगातील पहिल्या १० देशांमध्ये सौदी अरेबिया हा एकमेव असा देश आहे की जीडीपीचा बहुतांश भाग संरक्षण बजेटवर खर्च करतो.

फ्रान्सः युरोपियन देश फ्रान्स हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य असून त्याचे संरक्षण बजेट ५०.१ अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी जीडीपीच्या १.९ टक्के संरक्षणावर खर्च केला. संरक्षण बजेटच्या बाबतीत फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे.

जर्मनीः आणखी एक युरोपियन देश जर्मनीने संरक्षण बजेटच्या बाबतीत सातवे स्थान मिळवले. जर्मनीचे संरक्षण बजेट ४९.३ अब्ज डॉलर्स होते. संरक्षण अर्थसंकल्पात त्याने जीडीपीच्या १.३ टक्के खर्च केला.

ब्रिटनः संरक्षण बजेटवर ब्रिटनने ४८.७ अब्ज डॉलर्स खर्च झाले. संरक्षण बजेट म्हणून ब्रिटनने आपल्या जीडीपीच्या १.७ टक्के खर्च केला. अशाप्रकारे संरक्षण बजेटच्या बाबतीत ब्रिटन आठव्या स्थानावर आहे.

जपान: आशियाई देश जपान संरक्षण बजेटच्या बाबतीत नवव्या स्थानावर असून त्याचे संरक्षण बजेट ४७.६ अब्ज डॉलर्स इतके आहे. संरक्षण अर्थसंकल्पात जीडीपीचा ०.९ टक्के होता.

दक्षिण कोरिया: उत्तर कोरियाशी झालेल्या तणावामुळे दक्षिण कोरियाला आपल्या संरक्षण बजेटवर जास्त पैसे खर्च करावे लागतात. संरक्षण अर्थसंकल्पात ते दहाव्या क्रमांकावर आहे. त्याचे संरक्षण बजेट ४३.९ टक्के होते आणि त्यांनी संरक्षण बजेटवरील जीडीपीच्या २.७ टक्के खर्च केले.