Budget 2024 : कधी गुलाबी तर कधी निळा.... काय सांगतोय अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीचा रंग? By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:09 AM 2024-02-01T11:09:57+5:30 2024-02-01T11:37:27+5:30
Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : निर्मला सीतारामन यांनी गेल्या पाच वर्षात अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यामागे काय संदेश होता हे जाणून घेऊया... अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यासोबतच त्यांच्या नावे काही रेकॉर्डही होतील. त्या सलग पाच अर्थसंकल्प आणि एक अंतरिम बजेट सादर करणाऱ्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी येताना त्या विविध रंगाच्या साड्या नेसतात. मात्र त्याच्या मागे काहीतरी खास संदेश असतो. निर्मला सीतारामन यांनी गेल्या पाच वर्षात अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यामागे काय संदेश होता हे जाणून घेऊया...
प्रत्येक रंग काहीतरी सांगतो. 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर केला. गुलाबी रंग स्थिरता आणि गांभीर्याचे प्रतिक मानला जातो.
कोणत्याही शुभ कार्यासाठी पिवळा रंग शुभ मानला जातो आणि 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पिवळ्या रंगाच्या साडीत अर्थसंकल्प सादर केला होता. पिवळा रंग उत्साह आणि उर्जेचे प्रतिक आहे.
2021 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामन यांनी क्रिम आणि लाल रंगाची साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर केला. लाल रंग शक्ती आणि दृढनिश्चयाचे प्रतिक मानला जातो.
2022 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ब्राऊन रंगाची साडी नेसली होती. हा रंग सुरक्षेचं प्रतिक आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाल आणि काळ्या रंगाची बॉर्डर असलेल्या साडीत अर्थसंकल्प सादर केला होता. हा रंग शौर्य आणि शक्तीचं प्रतिक आहे.