२०५० पर्यंत भारत बनणार सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश, किती असेल हिंदूंची संख्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 20:41 IST2024-12-25T20:32:36+5:302024-12-25T20:41:57+5:30
Muslim population In India: सन २०५० पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या एका रिपोर्टनुसार २०५० पर्यंत भारत इंडोनेशियाला मागे टाकून सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश बनेल.

सन २०५० पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या एका रिपोर्टनुसार २०५० पर्यंत भारत इंडोनेशियाला मागे टाकून सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश बनेल. सद्यस्थितीत इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे.
या रिपोर्टनुसार २०५० पर्यंत भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही ३१ कोटींवर पोहोचेल. जगभरातील मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ११ टक्के एवढं असेल. या रिपोर्टनुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. तसेच हिंदूंची लोकसंख्या वाढून १ अब्ज ३ कोटी एवढी होईल. तसेच हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म बनणार आहे.
प्यू रिसर्च सेंटरच्या अध्ययनामध्ये वाढत्या मुस्लीम लोकसंख्येमागे तरुणांचं सरासरी वय आणि उच्च प्रजनन दर ही कारणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुस्लिमांमध्ये हे वय २२ वर्षे आहे, तर हिंदूंमध्ये २६ वर्षे आहे. ख्रिश्चन समाजामध्ये हे वय २८ वर्षे आहे.
भारतामध्ये मुस्लिम महिलांची सरासरी ३.२ मुलं आहेत. तर हिंदूंमध्ये ही सरासरी २.५ एवढी आहे. तर ख्रिश्चन समाजामध्ये ही सरासरी २.३ एवढी आहे.
या अहवालानुसार उच्च प्रजनन दरामुळे भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढेल. २०१० मध्ये १४.४ टक्के असलेली मुस्लीम लोकसंख्या ही २०५० मध्ये वाढून एकूण लोकसंख्येच्या १८.४ टक्के एवढी होईल. मात्र तरीही भारतामध्ये हिंदूंची संख्या ही सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, नायजेरिया आणि बांगलादेशमधील एकूण मुस्लिमांच्या संख्येपेक्षा अधिक असेल.
तर भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची एकूण लोकसंख्येमध्ये असलेली २.५ टक्के संख्या ही घटून २.३ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असेही या अहवालात म्हटले आहे.