Can we travel by train with Diwali crackers? Know About Railway rules banned items list
मंडळी, दिवाळीला गावी फटाके घेऊन चाललाय का?; आधी रेल्वेचे नियम वाचा, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 08:00 PM2023-11-05T20:00:26+5:302023-11-05T20:06:46+5:30Join usJoin usNext दिवाळी जवळ येत आहे. प्रत्येकाला हा सण आपल्या प्रियजनांसोबत घरी साजरा करायचा असतो. त्यामुळेच आता परराज्यात नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणारे मोठ्या संख्येने आपापल्या घरी परतत आहेत. रेल्वे हा भारतीयांचा आवडता प्रवास आहे. त्यामुळेच सणासुदीच्या काळात गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या घरी जातो आणि सणासाठी काहीतरी सोबत घेऊन जातो. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामुळे त्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. ट्रेनमध्ये फटाके आणि स्पार्कलर घेऊन प्रवास करता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. रेल्वे याला परवानगी देते का? हे जाणून घेऊ. या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. भारतीय रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये फटाके आणि स्पार्कलर्स यांसारखे ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्यास परवानगी देत नाही. म्हणूनच, जर तुम्ही तुमच्यासोबत फटाके आणि इतर तत्सम वस्तू घेऊन जाण्याचा विचार केला असेल, तर हा विचार डोक्यातून काढून टाका. ट्रेनच्या प्रवासात निषिद्ध वस्तूंसह पकडले गेल्यास मोठ्या संकटात सापडू शकता. भारतीय रेल्वे प्रवाशांना वारंवार फटाके घेऊन प्रवास करू नये, असे आवाहनही करते. जर कुणी असं करत असेल तर रेल्वे त्याविरोधात कठोर कारवाई करते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासादरम्यान प्रवाशाने प्रतिबंधित वस्तूंपैकी कोणतीही वस्तू बाळगल्यास, त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. या कलमांतर्गत प्रवाशाला १००० रुपये दंड किंवा तीन वर्षांचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. फटाके प्रतिबंधित वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने, ट्रेनमध्ये पकडले गेल्यास तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे दिवाळी सण जवळ येत असल्याने तुम्ही घरी जाताना किंवा गावी जाताना फटाके घेऊन जाण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. ट्रिपला जाताना विचार न करता सामान बांधून ठेवलं तर अडचणीत येऊ शकतात. वास्तविक, रेल्वेने अशा अनेक गोष्टींना ट्रेनमध्ये नेण्यास बंदी घातली आहे ज्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. या वस्तू आहेत ज्यामुळे ट्रेनमध्ये आग लागण्याचा धोका असतो. ट्रेन अस्वच्छ होते, प्रवाशांची गैरसोय होते आणि ट्रेनमध्ये अपघात होतो. या वस्तू प्रवाशांच्या डब्यात सोबत नेल्या जाऊ शकत नाहीत किंवा लगेज व्हॅनमध्येही ठेवता येत नाहीत. या वस्तूंसह तुम्ही रेल्वेतून प्रवास केला आणि पकडले गेला तर जेलमध्ये जावं लागेल. स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील रसायन, फटाके, ऍसिडस्, दुर्गंधीयुक्त वस्तू, चामडे किंवा ओली त्वचा, पॅकेजमध्ये आणलेले तेल, ग्रीस, अशा वस्तू ज्या तुटल्या किंवा गळाल्या तर रेल्वे प्रवासादरम्यान वस्तू किंवा प्रवाशांचे नुकसान होऊ शकते. अशा वस्तू रेल्वे प्रवासात सोबत नेण्यास मनाई आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी ट्रेनमध्ये २० किलोपर्यंत तूप घेऊन जाऊ शकतात, परंतु तूप टिनच्या डब्यात चांगले पॅक केले पाहिजे.टॅग्स :रेल्वेदिवाळी 2023railwayDiwali