Capital Delhi is known for pollution; Greater danger to citizens' health
राजधानी दिल्ली प्रदुषणाच्या विळख्यात; नागरिकांचं आरोग्य धोक्यात By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:55 PM2019-11-05T12:55:41+5:302019-11-05T13:04:21+5:30Join usJoin usNext दिल्लीत प्रदुषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षातील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीत २४ तासांतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी दुपारी चार वाजता ४९४ इतका म्हणजेच अतिगंभीर (सीव्हिअर प्लस) होता. या पूर्वी ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी हा निर्देशांक ४९७ होता. अतिधोकादायक प्रदूषणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये (एनसीआर) कोणतीही बांधकामे करण्यावर बंदी घातली आहे. न्यायालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहिल. तरीही बांधकामे सुरू ठेवणाऱ्यांना १ लाख व कचरा जाळणाऱ्यांना पाच हजारांचा दंड आकारण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तिथे वाहनांकरिता अरविंद केजरीवाल सरकारने सम-विषम योजना सोमवारपासून लागू केली. दिवाळीत दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. टॅग्स :दिल्लीप्रदूषणdelhipollution