सियाचीनमध्ये पहिल्यांदाच महिला मेडिकल ऑफिसरची नियुक्ती, कोण आहेत त्या? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 01:49 PM 2023-12-06T13:49:08+5:30 2023-12-06T13:55:06+5:30
Captain Geetika Koul: भारतीय लष्कराने पहिल्यांदा जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये एका महिला डॉक्टरची तैनाती केली आहे. सियाचीनमध्ये कॅप्टन गीतिका कौल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने पहिल्यांदा जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये एका महिला डॉक्टरची तैनाती केली आहे. सियाचीनमध्ये कॅप्टन गीतिका कौल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या या ठिकाणी नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी बनल्या आहेत. फायर अँड फ्युरी कोअरने याची माहिती दिली आहे.
कॅप्टन गीतिका कौल यांना प्रतिष्ठित सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर हे यश मिळालं आहे. यादरम्यान, त्यांना अधिक उंच ठिकाणी राहण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं. त्याशिवाय ट्रेनिंगमध्ये स्वत:ला वाचवण्याचं तंत्र आणइ विशेष उपचार प्रक्रिया समाविष्ट आहेत.
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कोअरने सांगितले की, स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल सियाचीन बॅटल स्कूलमध्ये यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला चिकित्सा अधिकारी बनल्या आहेत.
कॅप्टन गीतिका कौल यांनी आपल्या या यशाबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसेच भारतीय लष्कराचेही आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, देशाची सेवा करण्यासाठी निवड होणे ही गर्वाची बाब आहे. मी देशासाठी माझं कर्तव्य पार पाडेन. तसेच प्राण पणाला लावून त्याचं संरक्षण करेन.
सियाचीन ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. येथील सामरिक महत्त्वाबरोबरच हा भाग येथील नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे ओळखला जातो.
सियाचीन हा भाग भारतासोबतच पाकिस्तानसाठीही महत्त्वपूर्ण आहे. सियाचीन हिमालयातील काराकोरम पर्वत रांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ५७५३ मीटर उंचीवर आहे.