मानवी तस्करी प्रकरणी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 22:10 IST2018-03-16T22:10:03+5:302018-03-16T22:10:03+5:30

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे.

2003मध्ये झालेल्या मानवी तस्करी प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

पंजाबमधील पटियाला कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

दलेर मेहंदी आपल्या म्युझिक टीमसोबत लोकांना परदेशात पाठवत आणि त्याबदल्यात मोठी रक्कम मिळवत होता, असा आरोप आहे.

मानवी तस्करीसंदर्भात दलेर मेंहदीवर तब्बल 31 गुन्हे होते.