ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली सुरु; 'त्या' राज्यांना दिले निर्बंधाबाबत निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 07:13 PM2021-12-12T19:13:46+5:302021-12-12T19:21:11+5:30

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग भारतातही आढळून आला आहेत. या नवीन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा ( Omicron) संसर्ग भारतातही आढळून आला आहेत. या नवीन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे. डेल्टाच्या संसर्गाचा वेग खूप अधिक होता. यामध्ये रुग्णांना सौम्य आणि गंभीर अशी दोन्ही लक्षणे दिसत होती. त्यामध्ये तीव्र ताप, खोकला. श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये वेदना, रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता यासारखी लक्षणे दिसत होती. आता कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगासमोर नवे आव्हान बनून समोर आला आहे. त्याचे गांभीर्य, संसर्गाचा वेग आणि लक्षणांबाबत वेगवेवळे दावे करण्यात येत आहे.

मिझोराम, केरळ आणि सिक्कीम या तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक असल्याचे आढळून आले असून स्थिती गंभीर आहे. या अनुषंगाने ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे. जिथे रुग्णसंख्या वाढत असेल तिथे जिल्हास्तरावर कडक उपाययोजना कराव्यात आणि संसर्ग वाढलेल्या जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू करण्याचे केंद्राचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत.

केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुदुचेरी, मणिपूर, प. बंगाल, नागालँड या राज्यांतील १९ जिल्ह्यांत दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्गदर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. तसेच तीन राज्यांतील ८ जिल्ह्यांत संसर्गदर १० टक्क्यांहून जास्त आहे. त्यामुळे २७ जिल्ह्यांवर बारीक लक्ष ठेवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केलाय. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये ४० वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ओमायक्रोन पॉसिटीव्ह आढळलेल्या ४० वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे.

राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या १८ वर पोहचली आहे. त्यापैकी ७ जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. पिपंरी चिंचवडमध्ये दहा, मुंबईत चार, पुण्यात एक आणि डोंबिवलीमध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन व्हेरियंटने नागपूरमध्येही शिरकाव केलाय. दक्षिण आफ्रिकामधून आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉन झाल्याचं स्पष्ट झालं आहे.