Centre may reduce interval between Covishield doses
कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर लवकरच बदलणार?; मोदी सरकारकडून तयारी सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:33 PM2021-09-22T21:33:32+5:302021-09-22T21:39:02+5:30Join usJoin usNext केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोदी सरकार लागलं कामाला देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे. देशातील लसीकरण अभियानात कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा सर्वाधिक वापर होत आहे. सीरमची उत्पादन क्षमता प्रचंड असल्यानं देशातील सर्वाधिक नागरिकांना कोविशील्डची लस मिळाली आहे. तर भारत बायोटेकची उत्पादन क्षमता कमी असल्यानं कोवॅक्सिन घेतलेल्यांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. यासाठीचा निर्णय लवकरच सरकार घेऊ शकतं. केरळ उच्च न्यायालयानं याबद्दलचा आदेश दिल्यानंतर केंद्र सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. त्यामुळेच लवकरच मोठा निर्णय होऊ शकतो. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची परवानगी खासगी रुग्णालयं आणि क्लिनिकला दिली जाऊ शकते. खासगी रुग्णांलयात पैसे देऊन लस घेणाऱ्यांना पहिल्या डोसनंतर दुसरा डोस ४ आठवड्यांनंतर घेता येऊ शकेल. असा पर्याय सरकारकडून दिला जाऊ शकतो. सध्याच्या घडीला कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे इतकं आहे. या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला एक महत्त्वाचा आदेश दिला होता. कोविन पोर्टलवर कोविशील्ड लसीचा दुसरा डोस निश्चित करताना ४ आठवड्यांच्या अंतराचा पर्याय देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविशील्डचा दुसरा डोस लवकर घेण्याची परवानगी राज्य आणि केंद्र सरकार देऊ शकत असेल, तर मग दुसरा डोस लवकर उपलब्ध करून द्यावा, असं कुमार यांनी म्हटलं. किटेक्स गारमेंट्स लिमिटेड नावाच्या एका कंपनीनं उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आमच्या कर्मचाऱ्यांना ८४ दिवसांच्या आधी कोविशील्डचा दुसरा डोस देण्याची मागणी कंपनीनं याचिकाच्या माध्यमातून न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायालयानं सकारात्मक भूमिका घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच कोविशील्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ आठवड्यांवरून ८ आठवड्यांवर आणणार असल्याचं वृत्त नुकतंच आलं होतं. आधी कोविशील्डच्या दोन डोसमधलं अंतर २८ दिवस होतं. मात्र त्यानंतर ते ६ ते ८ आठवडे करण्यात आलं. त्यानंतर ते १२ ते १६ आठवडे करण्यात आलं.Read in Englishटॅग्स :कोरोनाची लसCorona vaccine