चंद्रावर अशोक स्तंभाचे चित्र खरंच आहे का? वाचा या फोटो मागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 02:01 PM2023-08-24T14:01:19+5:302023-08-24T14:08:41+5:30

काल भारताच्या चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाले आहे.

चंद्रावर छापलेला अशोक स्तंभ, काय आहे या चित्राचे रहस्य?

हा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. अनेकांनी लिहिले की, यानाचा रोव्हर चंद्राच्या मातीवर धावत आहे आणि अशोक स्तंभाच्या खुणा सोडत आहे.

खरंच असं आहे का? इस्रोने हे चित्र प्रसिद्ध केले आहे की लोकांनी तयार केलेला फोटो खरा म्हणून पसरवला जात आहे.

अगोदर हे जाणून घ्या की विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर त्याचा रोव्हर प्रज्ञान बाहेर फिरायला लागला आहे. इस्रोने हे फोटो शेअर केले आहेत हे जाणून घ्या.

अशोकस्तंभाचे प्रतिक असलेले हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहे, ते खरे नाहीत.

इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावरून असे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत.

असा फोटो येत्या काही तासांत किंवा दिवसांत दिसून येण्याची शक्यता आहे.

आपल्याला खरा वाटणारा हा फोटो एडीट केलेला आहे.

या फोटोत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दाखवले आहेत पण तेही खरे नाहीत. असे फोटो प्रतिकात्मक बनवली जातात.