गाईच्या पोटात सापडलं असं रसायन ज्यामुळे नष्ट होऊ शकतं प्लॅस्टिक, संशोधनातून दावा By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 04:09 PM 2021-07-06T16:09:18+5:30 2021-07-06T16:16:25+5:30
Science News: भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्यामधील गुणांमुळे आणि धार्मिक अधिष्ठानामुळे भारतात गाईला माता म्हटले जाते. आता आज आम्ही तुम्हाला गाईबाबतचा खास गुण सांगणार आहोत ज्याबाबत तुम्ही याआधी कधी ऐकलं नसेल. भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्यामधील गुणांमुळे आणि धार्मिक अधिष्ठानामुळे भारतात गाईला माता म्हटले जाते. आता आज आम्ही तुम्हाला गाईबाबतचा खास गुण सांगणार आहोत ज्याबाबत तुम्ही याआधी कधी ऐकलं नसेल. गाईच्या पोटामध्ये एस असे इंझाइम सापडलं आहे ज्यामुळे विशिष्ट्य प्रकारचं प्लॅस्टिक विरघळू शकते. किंवा प्लॅस्टिलका रिसायकल करू शकते. भविष्यामध्ये प्लॅस्टिकच्या कचऱ्याला रिसायकल करण्यासाठी गाईच्या पोटात मिळणाऱ्या या विशिष्ट्य प्रकारच्या रसायनाचा उपयोग केला जाऊ शकेल.
गाईच्या पोटात जे रसायन सापडते त्या रसायनामुळे लीइथाइलीन टेरेप्थेलेट पासून बनणाऱ्या सोड्याच्या बाटल्या, खाण्याची पाकिटे आणि सिंथेटिक फॅब्रिकला सहजपणे तोडता, विरघळवता किंवा रिसायकल करता येऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटाच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार गाईच्या पोटातील सर्वात मोठ्या भागात तयार होणाऱ्या एका पातळ पदार्थामध्ये वाहणारा मायक्रोब असतो. तो गाय आणि बकऱ्यांच्या पोटात असतो.
हा मायक्रोड रयुमनमध्ये तयार होत असतो. हा कुठल्याही प्रकारच्या पीईटी प्लॅस्टिकला पचवण्यासाठी सक्षम असतो. गाय मोठ्या प्रमाणात गवत आणि शाकाहारी चारा खाते त्यामुले ही प्रक्रिया घडून येते. त्यामुळे तिच्या शरीरात नैसर्गिक पॉलिस्टर तयार होते. त्याला कटिन म्हणतात. पीईटी प्लॅस्टिकमध्येसुद्धा हेच रसायन असते. कटिन झाडांच्या बाहेरील भागामध्ये असलेल्या क्युटिकल्समधून निघणारा व्हॅक्ससारखा पदार्थ असतो.
व्हिएन्नास्थित युनिव्हर्सिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेच अँड लाइफ सायन्सेसमधील सिनियर सॅंटिस्ट डोरिस रिबिट्श यांनी सांगितले की, कटिनमुळे फळे आणि भाज्यांमध्ये चिकटपणा आणि चमकदारपणा निर्माण होतो. टोमॅटो किंवा सफरचंदाच्या बाहेरील सालीला पाहिले असता त्यावर कटिनचा थर असल्याचे दिसून येते. जर कुठल्याही प्रकारची बुरशी किंवा जिवाणू फळ किंवा भाजीवर हल्ला करण्यासाठी आला तर हे कटिन विशिष्ट्य प्रकारचे एंजाइम सोडायला सुरुवात करते.
या एंजाइमला कटिनेसेस म्हणतात. हे कटीनला हायड्रोलाइज करतात. म्हणजेच हे तत्काळ पातळ पदार्थामध्ये परिवर्तीत होते. त्यामुळे फंगस किंवा बॅक्टेरिया केवळ एका ठराविक भागापर्यंत मर्यादित राहतात. डोरिस रिबिट्स म्हणतात की, त्यांनी कटिनेसेस एंजाइमला मायक्रोब्सपासून वेगळे करण्यामध्ये यश मिळवले आहे. नंतर त्यांनी हेच एंजाइम गाई्च्या पोटामध्ये असल्याचे पाहिले. हे एंजाइम कुठल्याही प्रकारच्या पीईटी पॉलिस्टरला पचवू शकते.
डोरिस यांनी सांगितले की, गाय मोठ्या प्रमाणात झाडपाला खाते. त्यामुळे तिच्या पोटात असे मायक्रोब्स मिळणे शक्य आहे. ते प्लॅस्टिकचे पचन करवणारे एंजाइम कटिनेसेस बनवतात. दोन जुलै रोजी फ्रंटियर इन बायोइंजिनियरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्च स्टडीच्या म्हणण्यानुसार गाईच्या रयुमेनमध्ये मिळालेले मायक्रोब पीईटीला विरघळवू शकतात. त्याबरोबरच पॉलीबुटिलीन एडिपेड टेरेप्थेलेट आणि पॉलीइथाइलीन फुरानोएट यांनाही विरघळवू शकतात.
पीबीएटीपासून कंपोस्टेबल प्लॅस्टिक बॅग बनवल्या जातात. पीईएफला झाडांवरून मिळालेल्या सामुग्रीपासून रिसायकल करून बनवले जाते. गाईच्या पोटातून मिळणारे एंजाइम प्लॅस्टिकला कशाप्रकारे रिसायकल करते हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी प्रत्येक प्रकारच्या प्लॅस्टिकला गाईच्या रयुमेन लिक्विडमध्ये एक ते तीन दिवसांपर्यंत ठेवण्यात आले. रयुमेन लिक्विडने पीईएपला नष्ट केले. मात्र त्याने सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकला योग्य पद्धतीने विरघळवले.
जेव्हा डोरिस आणि त्यांच्या टिमने रयुमेन लिक्विडचा डीएनए सॅम्पल घेतले. तेव्हा त्यांना विशेष प्रकारच्या मायक्रोब्स विषयी समजले. हे मायक्रोब्स प्लॅस्टिकला विरघळवण्यात आणि तोडण्यात मदत करतात. डीएनएच्या सॅम्पलमध्ये ९८ टक्के भाग हा बॅक्टेरिया किंग्डमचा होता. यामध्ये सर्वात मोठा आणि शक्तीशाली बॅक्टेरिया स्युडोमोनास हा होता. तो प्लॅस्टिकचे वेगाने विघटन घडवून आणतो. अशा बॅक्टेरियाबाबत याआधीही संशोधन झाले आहे. ते अप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी आणि जर्नल ऑफ हजार्ड्स मटेरियलमध्ये प्रकाशित झाली आहे.
गाईच्या पोटातून काढण्यात आलेल्या लिक्विडमध्ये एसिनोटोबॅक्टर बॅक्टिरियाचे प्रमाणही खूप अधिक दिसून आले. तेसुद्धा सिंथेटिक पॉलिस्टरचे विघटन घडवण्यामध्ये खूप अधिक प्रमाणात मदत करते. याबाबत २०१७ मध्ये जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूट केमिस्ट्रीमध्ये संशोधन प्रकाशित झाले आहे. डोरिस सांगतात की प्रत्येक बॅक्टेरिया, प्रत्येक मायक्रोब आणि प्रत्येक एंजाइमचे काम वेगवेगळे असते. ते वेगवेगळ्या टार्गेटवर आपले लक्ष्य बनवते.
युनिव्हर्सिटी ऑफ मानिटोबा डिपार्टमेंट ऑफ बायोसिस्टिम्स इंजिनियरिंगच्या मॉलिक्युरल बायोलॉजिस्ट डेविड लेविस यांनी सांगितले की, हे अध्ययन खूप उपयुक्त आहे. आमच्या निसर्गामध्ये अशी रसायने उपलब्ध आहेत जी प्लॅस्टिकसारख्या पदार्थांचे विघटन करू शकतात. मात्र त्यांना योग्य पद्धतीने प्लॅस्टिकसमोर आणण्याची गरज आहे. तसेच असे अनेक समुद्री जीव आहेत जे कटिनेसेस उत्सर्जित करतात. तेसुद्धा समुद्रातील प्लॅस्टिक आणि सिंथेटिक पॉलिस्टरला नष्ट करू शकतात.