लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 09:45 AM2024-10-07T09:45:24+5:302024-10-07T10:00:58+5:30

एअर शोसाठी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

चेन्नईच्या मरिना बीचवर रविवारी ९२ व्या भारतीय वायुसेना दिनानिमित्त एअर शोचे आयोजन करण्यात आलं होतं. या एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे.

एअर शोसाठी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक हा शो पाहण्यासाठी उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता एअर शो सुरू झाला. याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. एअर शो पाहण्यासाठी लांबून लोक आले होते. परिस्थिती अशी होती की चेन्नईच्या रस्त्यांवर शेकडो गाड्या दिसत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

एअर शो पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक मरिना बीचवर होते, कार्यक्रम संपल्यानंतर लोक तिथून निघू लागले, प्रचंड जमावाने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

उन्हाचा तडाखा एवढा होता की, अनेकांनी मरिना बीचवर छत्र्या उघडून कडक उन्हापासून स्वत:चा बचाव केला होता. मरीना बीचवर आयोजित एअर शोनंतर लोकांना घरी परतणं खूपच कठीण झालं.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, एअर शोच्या ठिकाणाजवळील अण्णा स्क्वेअर येथे असलेल्या बस स्टॉपवर लोकांची गर्दी जमली होती. शो संपल्यानंतर घटनास्थळी थोडा गोंधळ उडाला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती आणि उष्णतेमुळे अनेक लोक बेशुद्ध झाले आणि त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

चेन्नई मरीना बीचवर आयोजित केलेल्या एअर शोदरम्यान ही अशी घटना घडल्याचं समजताच मला खूप धक्का बसल्याचं तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं.

शहराच्या विविध भागांना जोडणाऱ्या मरीनापासून मुख्य रस्त्यांवरही वाहतूक ठप्प होऊन तासनतास वाहनं अडकून पडली होती. तसेच रेल्वे स्टेशनवरही लोकांची मोठी गर्दी होती.

टॅग्स :चेन्नईChennai