In Chennai, heavy rain disrupts life-time, school-college vacation
चेन्नईमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शाळा-कॉलेजला सुट्टी By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 08:49 PM2017-11-01T20:49:27+5:302017-11-01T21:07:17+5:30Join usJoin usNext त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने राज्यभरात धोक्याचा इशारा देत पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मागील 24 तासांत राज्यातील तटवर्ती भागात जोरदार पावसाची नोंद झाली. बहुतांश शाळांना सुटी देण्यात आली असून रस्ते आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. ऑक्टोबर महिन्यात चेन्नईत झालेल्या पावसाने मागील 10 वर्षांचा विक्रम मोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवस व ६ ते ७ नाेव्हेंबरलाही चेन्नईसह जवळपासच्या भागात सरासरीहून अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज अाहे. तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा प्रभाव सर्वसामान्याहून अधिक असणे, हे जास्त पाऊस होण्यामागील कारण असल्याचं बोललं जात आहे. चेन्नईच्या इतिहासात पुराचा विचार करता 2015 मध्ये अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. टॅग्स :पाऊसचेन्नईRainChennai