China Wants To Create Tension Between India And Nepal Over Lipulekh Link Road kkg
भारत कोरोना संकटात असताना चीन साधतोय संधी; 'या' देशाच्या मदतीनं वाढवतोय अडचणी? By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:52 PM2020-05-15T15:52:17+5:302020-05-15T16:00:56+5:30Join usJoin usNext चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूचा सामना अवघं जग करत असताना चीनकडून मात्र विविध मार्गांनी कुरघोड्या केल्या जात आहेत. कैलास मानसरोवरपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारत उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये चीन-नेपाळ सीमेजवळील लिपुलेख पासपासून ५ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या उद्घाटनावर नेपाळनं आक्षेप नोंदवला. विशेष म्हणजे याआधी कधीही नेपाळनं या रस्त्यावरून वाद निर्माण केला नव्हता. नेपाळ चीनच्या इशाऱ्यावरुन नव्या रस्त्याला विरोध करत असावा, अशी शक्यता भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज नरवणे यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. नरवणे यांनी चीनचा थेट उल्लेख केला नाही. मात्र नेपाळच्या विरोधामागे अप्रत्यक्षपणे चीनचा हात असल्याचं सुचवलं. यामध्ये कोणताच वाद असल्याचं मला वाटत नाही. काळ्या नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचं असल्याचं त्यांच्या राजदुतांनी सांगितलं. मात्र त्यावरुन कोणताही वाद नसल्याचं ते म्हणाले होते, असं नरवणेंनी म्हटलं. काळ्या नदीच्या पूर्वकडील भाग नेपाळचा आहे, असं त्यांचे राजदूत सांगतात. मात्र भारतात तयार केलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे, या गोष्टीकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधलं. काळ्या नदीकडून पुढे सरकल्यानंतर एक ट्राय जंक्शन आहे. त्या ठिकाणी भारत, नेपाळ, चीनच्या सीमा आहेत, अशी माहिती नरवणेंनी दिली. ट्राय जंक्शन भागात एखादा लहान-मोठा वाद असू शकतो. त्यामुळे नेपाळला काहीतरी अडचण असावी, असं लष्करप्रमुख म्हणाले. नेपाळनं कोणाच्या तरी सांगण्यावरुन रस्त्याला विरोध केला असावी. नेपाळ दुसऱ्याच्या इशाऱ्यावरुन आक्षेप नोंदवत असल्याची दाट शक्यता नरवणेंनी बोलून दाखवली.टॅग्स :चीननेपाळमनोज नरवणेभारतीय जवानchinaNepalmanoj naravaneIndian Army