China Wants To Deploy Its Security Forces In Pakistan To Secure CPEC Projects, Its Danger for India
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:51 PM2024-11-15T16:51:05+5:302024-11-15T17:03:15+5:30Join usJoin usNext पाकिस्तानात काम करणाऱ्या चीनच्या लोकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यातच चीन आता पाकिस्तानात त्यांचे सुरक्षा जवान तैनात करण्याचा विचार करत आहेत. त्याबाबत सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी पाकिस्तानवर चीन दबाव आणत आहे. मागील महिन्यात कराची एअरपोर्टवर झालेल्या बॉम्बस्फोटात २ चीनी इंजिनिअरचा मृत्यू झाला होता. हे दोघे चीनचे नागरिक थायलँडवरून सुट्टी घालवल्यानंतर कामावर परतले होते. या घटनेनंतर चीन पाकिस्तानात काम करणाऱ्या चीनी लोकांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी फोर्स तैनात करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानात अनेक प्रकल्पात चीनचे इंजिनिअर काम करत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे चीन पाकिस्तान इकोनॉमिक कोरिडॉर आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा ड्रिम प्रोजेक्ट बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा हा भाग आहे. यावर्षी चीन पाकिस्तान इकोनॉमिक कोरिडॉरसाठी काम करणाऱ्या चीन इंजिनिअरवर हल्ले झालेत. न्यूज एजेन्सी रॉयटर्सनुसार, एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, चीन त्यांचे सुरक्षा जवान इथं तैनात करू इच्छितात. त्यासाठी चीनने पाकिस्तानला लिखित प्रस्ताव पाठवला आहे. पाकिस्तान अद्याप याला मंजुरी दिली नाही. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा चीनच्या या प्रस्तावाविरोधात आहेत. पाकिस्तानात सध्या ३० हजार चीनी नागरिक काम करत आहेत. त्यातील बहुतांश चीन पाकिस्तान इकोनॉमिक कोरिडॉरवर कार्यरत आहेत. ३ हजार किमी लांब असलेला हा रोड चीनच्या काशगरपासून सुरू होऊन पाकिस्तानच्या ग्वादर येथे संपतो. ग्वादर हा भाग बलूचिस्तान परिसरात आहे. बलूचिस्तानचा आरोप आहे की, चीन आणि पाकिस्तान मिळून त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करत आहेत. यामुळेच बलूच लिबरेशन आर्मी या प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांना आणि इंजिनिअरना टार्गेट करत आहेत. चीनी कामगारांवर हल्ला करण्याचा दीर्घ काळाचा इतिहास आहे. २०१८ मध्ये कराचीत चीन राजदूत कार्यालयाजवळ स्फोट झाला. २०१९ मध्ये ग्वादर पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेल आणि २०२० मध्ये पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंज, २०२२ मध्ये कराची यूनिवर्सिटीजवळ हल्ले झालेत. २०२१ मध्ये ग्वादरमध्ये चीन कामगारांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता तिथे अनेकजण जखमी झाले होते. बलूच लिबरेशन आर्मीसोबतच दुसऱ्या दहशतवादी संघटना चीनी नागरिकांना लक्ष्य करतात. २०१७ मध्ये क्वेटा येथे चीनी जोडप्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. तहरीक ए तालिबान पाकिस्ताननेही अनेकदा चीनी नागरिकांना निशाणा बनवलं आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामुळे चीन संतप्त झाला आहे. त्यामुळे चीनी लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांना त्यांचे जवान पाकिस्तानात तैनात करायचे आहेत. पाकिस्तानात काम करणाऱ्या चीनी कामगारांच्या सुरक्षेसाठी एक सुरक्षा प्रोटोकॉल आहे. ज्यावर दोन्ही देशाची मान्यता आहे. ज्याठिकाणी चीनी कामगार काम करतात तिथे उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था दिली जाते. अलीकडेच चीन पाकिस्तानात बैठक झाली, या बैठकीत पाकिस्तानी चीनी कामगारांना सुरक्षा देण्यास अयशस्वी ठरतंय असा आरोप चीनने केला. चीनने पाकिस्तानात ६२ अरब डॉलर गुंतवणूक केलीय. २०१५ पासून चीन पाकिस्तानात CPEC या प्रकल्पावर काम करतेय. या कॉरिडोर प्रकल्पात हायवे, रेल्वे लाईन, पाईपलाईन आणि ऑप्टिकल केबल नेटवर्क तयार केले जात आहे. चीन सातत्याने पाकिस्तानवर त्यांचे सुरक्षा जवान पाकिस्तानात तैनात करण्यासाठी दबाव आणत आहे त्याला पाकिस्तानने अद्याप मंजुरी दिली नाही. जर आज नाही तर उद्या पाकिस्तानने याला मंजुरी दिली तर भारतासाठी ही चिंता वाढवणारी बाब असेल. कारण चीन सेना पीओकेवरही येणार, त्याठिकाणी अनेक प्रकल्प सुरू आहेत. भारत पाकव्याप्त काश्मीरात अन्य सैन्याची उपस्थिती खपवून घेणार नाही. POK मध्ये चीनी जवानांच्या तैनातीने भारताच्या उत्तरेकडील सीमेवर चीन हस्तक्षेप करेल. भविष्यात यामुळे भारताला दुहेरी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.टॅग्स :भारतचीनपाकिस्तानIndiachinaPakistan