भारताविरोधात चीन आखतंय ‘ही’ मोठी युद्धनीती; लडाख सीमेवरील हालचालींवर करडी नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:41 AM2020-05-20T10:41:58+5:302020-05-20T10:53:21+5:30

लडाखमध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये सुरु असणारा बेबनाव भलेही स्थानिक पातळीवर सोडवला जात असेल पण हे प्रकरण पूर्णपणे संपलेले नाही. चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. मोटार बोटीही मोठ्या संख्येने तैनात केल्या आहेत.

सूत्रांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, भारताचे सर्वोच्च नेतृत्व परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहेत आणि त्यातील प्रत्येक कामकाजाची माहिती घेत आहेत.

एकीकडे संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे त्यावेळी चीनचा हा घाणेरडा डाव सुरु आहे. चीनपासून कोरोना विषाणूचा प्रसार संपूर्ण जगात झाला आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायरसच्या प्रादुर्भावाची चौकशी झाली पाहिजे आणि हजारो मृत्यूची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आता वाढत आहे.

अशा वेळी चीन या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी तणावाची परिस्थिती निर्माण करत आहे इतकचं नाही तर नेपाळला भारताविरूद्ध भडकवलं जा आहे. लिपुलेख मानसरोवर लिंक रोडवर नेपाळला भडकावण्यात चीनचा हात आहे.

भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमधील संघर्ष सामान्य आहे. सीमा पूर्णपणे स्पष्ट नाही, म्हणून जेव्हा जेव्हा दोन्ही देशातील सैनिक पेट्रोलिंग दरम्यान एकमेकांना भेटतात तेव्हा सौम्य, कधीकधी तीव्र खटके उडत असतात. परंतु यावेळा हा संघर्ष गंभीर स्वरुपाचे रूप धारण करीत आहे.

संघर्षानंतर चीनने आपल्या बाजूने ताकद वाढविली आहे. या आठवड्यात चिनी सैनिक याच भागात सैन्य सराव करीत होते. त्या सैन्य अभ्यासामध्ये वापरली जाणारी जड शस्त्रे आणि सैन्य उपकरणेही चीनने तैनात केली आहेत.

चीनच्या सैन्यानेही पैंगोंग सो तलावाच्या काठावर पोजिशन घेतली आहे. आणि मोटरबोट्सच्या माध्यमातून आक्रमक गस्त चालवत आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय सैन्याने देखभाल केलेली तात्पुरती वास्तूही खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गलवानमध्ये ज्या ठिकाणी दोन्ही सैन्यामध्ये संघर्ष झाला तिथे अद्याप चिनी सैनिक तैनात आहेत, त्यास प्रत्युत्तर म्हणून भारताने सैन्याच्या संख्येत वाढ केली आहे.

चीनने गलवानमधील संघर्षाच्या ठिकाणापासून सुमारे ४ किलोमीटरच्या परिघात अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे.

सुत्रांनी सांगितले की, चिनी सैन्याचे संभाव्य लक्ष्य हे दरबूकशिओक-दौलत बेग ओल्डी (डीबीओ) रस्ता असू शकतो, जो मागील वर्षी भारताने बांधला होता. हा रस्ता सब सेक्टर उत्तर (एसएसएन) साठी जीवनवाहिनी आहे. तथापि, चीनला कोणत्याही प्रकारे रोखण्यासाठी भारतानेही सैनिकांची पुरेशी संख्या तैनात केली आहे.

ज्या ठिकाणी संघर्ष झाला त्या ठिकाणी चीनकडून ८० हून अधिक तंबू लावण्यात आले आहेत. याशिवाय चीनकडून तात्पुरती बचावात्मक जागादेखील सज्ज केल्या आहेत. चीनने गलवान नदीजवळ पुन्हा अंमलबजावणीची तयारी देखील केली आहे.