एडल्ट कन्टेंटवर क्रिएटर्सचा भर, युट्यूबच्या व्हिडिओतून दरमहा Online कमाई किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:08 IST2025-02-11T11:53:08+5:302025-02-11T12:08:16+5:30

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना हे दोघे सध्या एका ऑनलाईन कार्यक्रमामुळे वादात अडकले आहेत. अश्लील कन्टेंट आणि डार्क ह्यूमरला नॉर्मल बनवणे, म्हणजेच अशा गोष्टी ज्यावर विनोदी शैलीने भाष्य करणे जे कुणालाही सहज पचणार नाही. त्यात वर्जिनसारख्या मुद्द्यांना हात घालून लोकांना भडकवलं जाते.
या कन्टेंटसाठी Gen Z क्रिएटर्सला मिळतात, कंट्रोवर्सी, सामाजिक खळबळ, गॉसिपिंग आणि खूप सारे पैसे. सोशल मीडियावर जर पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुमच्या कंन्टेंटला जास्तीत जास्त व्ह्यूज, लाईक्स, कमेंट्स आणि शेअर मिळायला हवेत. त्यातून अधिक कमाई केली जाते. त्यात कन्टेंट क्वॉलिटीवर कमी चर्चा होते.
कॉमेडियन समय रैनाचा शो India's got lalent वर रणवीर अलाहाबादियाकडून आई वडिलांच्या नात्यावर केलेला विनोद यावर मोठा वाद रंगला आहे. रणवीर अलाहाबादियाने इंजिनिअरींग केल्यानंतर फिटनेस App लॉन्च केले. त्यानंतर बीयर बाइसेप्स नावाचं युट्यूब चॅनेल सुरू करण्यात आले.
२०१९ चा काळ होता, काही महिन्यात कोरोना धडकला आणि लॉकडाऊन लागले. सर्व जग कैद झाले होते. हातात मोबाईल आणि रिकामा वेळ खूप अधिक होता. याच काळाने रणवीर अलाहाबादियाचं नशीब पालटलं. त्यानं त्याच्या चॅनेलवर प्रियंका चोपडा, आयुषमान खुराणा, सैफ अली खानसारख्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. रणवीरच्या मुलाखतींना लाखोमध्ये व्ह्यूज आणि बंपर कमाई झाली.
कालांतराने रणवीरने त्याच्या व्हिडिओ कन्टेंटमध्ये विविधता आणली. संरक्षण, इतिहास, अध्यात्म आणि बॉलिवूड या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. जय शेट्टी, गौर गोपाल दास, अर्नोल्ह श्वार्जगेनर, सौरव गांगुली, रोहित शेट्टी यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींच्या त्याने युट्यूबवर मुलाखती घेतल्या आहेत. रणवीरच्या ७ युट्यूब चॅनेल्सवर १२ मिलियन फॉलोअर्स आहेत
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यात बरेच साम्य आहे. समय रैनाही इंजिनिअरींगचा विद्यार्थी होता. तो कॉमेडी व्हिडिओ करू लागला. जम्मू काश्मीरमध्ये जन्मलेला समय रैना वयाच्या १६ व्या वर्षीपासून कॉमेडी करत होता आणि तो याचे व्हिडिओ शूट करून युट्यूबवर टाकायचा.
त्याचीही कहाणी तशीच आहे. कोरोना काळात लोक घरात बंद होते. त्यावेळी हातात मोबाईल, रिकामा वेळ असल्याने समय रैनाने त्याच्या युट्यूब चॅनेलवर चेस दाखवायला सुरुवात केली. विश्वनाथन आनंदसारखे दिग्गज त्याच्या चॅनेलवर आलेत. काही महिन्यांपूर्वी जून २०२४ समयने इंडियाज गॉट लेटेंट नावाचा रिएलिटी शो लॉन्च केला.
हा शो प्रामुख्याने युवा वर्गात खूप लोकप्रिय बनला आहे. त्याचं कारण म्हणजे यातील कन्टेंट. यात विना फिल्टर आणि विना सेंसर कन्टेंट अपलोड केले जातात. समय रैनाचे सध्या सोशल मीडियावर १० मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. India's Got Latent मध्ये ज्या गोष्टी मुले-मुली खासगीत करतात ते एका प्लॅटफोर्मवर आणलं आहे. त्यातून पैसा आणि फेमही मिळत आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या कमाईबाबत वेगवेगळे दावे आहेत. त्याच्याकडे ७ युट्यूब चॅनेल आहेत. त्यात The Ranveer Show हा चॅनेल प्रमुख आहे. रिपोर्टनुसार युट्यूबमधून रणवीर दरमहिना ३५ लाखाहून अधिक कमाई करतो. koimoi वेबसाईटने रणवीर अलाहाबादिलाची संपत्ती ६० कोटी असल्याचं म्हटलं आहे. रणवीन अनेक ब्रँडसोबत काम करतो. त्यात फिटनेस, फॅशन, लाईफस्टाईल ब्रँडचा समावेश आहे. त्यातूनही त्याची कमाई होते.
समय रैनाचा युट्यूब चॅनेल आहे जिथे तो इंडिया गॉट लेटेंट आणि अन्य कॉमेडी व्हिडिओ अपलोड करतो. त्याची महिन्याची कमाई जवळपास दीड कोटी असल्याचं सांगण्यात येते. त्यात जाहिराती, सब्सक्राईबर्स आणि सुपरचॅटच्या माध्यमातून समय पैसे कमावतो. India got Latent चा त्याच्या कमाईचा मोठा सोर्स आहे. त्यात मेंबर्स ऑन्ली कन्टेंट आहे त्यात चाहते पैसे देऊन सब्सक्रिप्शन खरेदी करतात.