Coroanvirus: सीमारेषेवरही उजळले दिवे, सैन्यातील जवानांनी कोरोना वॉरीयर्सचे आभार मानले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 11:44 AM2020-04-06T11:44:37+5:302020-04-06T12:21:10+5:30

#IndianArmy soldiers light up the environment in inhospitable terrain while standing guard at our frontiers and express gratitude to the corona fighters. Let us fight #COVID19 together.

भारतीय सैन्या दलाच्या जवानांनीही दिवे लावून देशातील एकात्मतेचा संदेश दिलाय, बर्फाळ प्रदेशात कर्तव्य बजावणाऱ्या सैन्यांचा हा फोटो

सैन्यातील जवानांनी सीमारेषेवर टॉर्चने परिसर प्रकाशमय करत, कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकतेचा संदेश दिला

आर्ट ऑफ लिव्हींगचे गुरु श्री श्री श्री रविशंकर यांनीही तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत दिपप्रज्वलन केलं

एका झोपडीतही दिव्यानं प्रकाश पडला, गरिबांच्या घरातूनही एकतेचा संदेश मिळाला

बॉलिवूडचे शहंशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनीही घरातील लाईट्स बंद करुन बॅटरीच्या प्रकाशाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपणसही सहभागी असल्याचा संदेश दिलाय

आंध्र प्रदेशमधील न्यूज चॅनेलवर चक्क अंधकार स्क्रीन करुन बातम्या देण्यात आल्या. मोदींच्या आवाहनाला मिळालेही हा साद

भारतीय जवानांनी सीमारेषेवर दिवा लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

हैदराबादमधील भाजपा आमदार टी राजा सिंग यांनी चक्क मशाल पेटवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला

रविवारी रात्री ९ ते ९.०९ या वेळेत अनेक चमत्कारीक घटना घडल्या, त्यापैकी एक म्हणजे ही. चक्क लाईटचा ड्रेस परिधान करुन एक व्यक्ती रस्त्यावर फिरत होता

पाठिमागे विजयी विश्व तिरंगा प्यारा... अंगात सैन्याचा गणवेश आणि हाती कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी दिवा प्रज्वलन केलं

भारतीय सैन्याच्या ट्विटर हँडलवरुनही भारतीय सैन्याने रविवारी रात्री केलेल्या दिप ज्वलनाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत

बर्फाच्छादित भागात कर्तव्य बजावणाऱ्या सैन्यातील जवानाने देशातील डॉक्टर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील सर्वांचेच आभार मानले आहेत

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील अंधकार दूर करण्यासाठी सीमारेषेवरही जवानांमध्ये उत्साह दिसून आला, म्हणूनच दिवा लावण्यात आलाय