corona irdai permits life insurers to issue policies electronically
विमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 04:11 PM2020-08-05T16:11:18+5:302020-08-05T18:34:34+5:30Join usJoin usNext कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि सामान्य व्यवसायातील समस्या लक्षात घेता विमा नियमन करणारी संस्था 'आयआरडीए'ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आयआरडीएने जीवन विमा कंपन्यांना विमा पॉलिसी अर्थात ई-पॉलिसी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त दिली आहे. आयआरडीएने सांगितले की, सध्या 2020-21 दरम्यान जारी केलेल्या सर्व विमा पॉलिसींना ही परवानगी असेल. विविध विमा कंपन्यांना ग्राहकांपर्यंत पॉलिसी पाठविण्यात अडचणी येत असल्याची चिंता व्यक्त केली होती. यानंतर आयआरडीएने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विमा कंपन्यांनी कोरोना व्हायरसचा हवाला दिला आहे. त्याला आयआरडीएनेही सहमती दर्शविली आहे. आयआरडीएने असेही म्हटले आहे की, विमा कंपन्यांना ई-पॉलिसी पाहण्यासाठी आणि समजण्यासाठी ग्राहकांना 30 दिवसांचा कालावधी द्यावा लागेल. ई-पॉलिसी घेण्याबाबत ग्राहकांकडून संमती घ्यावी लागेल. जर ग्राहक अद्याप हार्ड कॉपी किंवा कागदपत्रांची मागणी करत असतील तर कंपन्यांनी ती पाठवावी लागेल. दरम्यान, नियामकाने जीवन विमा कंपन्यांना त्यांचे गुंतवणूक परतावा प्रत्येक तिमाहीमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्याची परवानगी दिली आहे.टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्याHealthcorona virus