कोरोना पॉझिटीव्ह आमदाराची हाथरसच्या पीडित कुटुंबाला भेट, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 01:32 PM2020-10-07T13:32:02+5:302020-10-07T14:29:18+5:30

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने देश हादरला आहे. त्यानंतर, देशातील अनेक राजकीय पक्षांनी हाथरसला भेट दिली.

हाथसरधील पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी, स्थानिक नेत्यांपासून ते काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, राहुल गांधींनीही हाथरसला भेट दिली.

आम आदमी पक्षाचे नेते व आमदार खासदारही हाथरसच्या पीडित कुुंबीयांना भेटायला आले होते.

खासदार संजय सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी हाथरसला भेट दिली, त्यावेळी त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता.

तर, आमदार कुलदीप कुमार यांनीही ५ ऑक्टोबर रोजी हाथरसला भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कुलदीप कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने योगी सरकारवर टीका करत, पीडित मुलीसाठी आवाज उठवला आहे.

बंदुकीच्या धाकाने आणि पोलिसांच्या बळाचा वापर करुन पीडित कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप आमदार कुमार यांनी केला आहे.

आमदार कुमार यांनी ५ ऑक्टोबर रोजी पीडित कुटुंबाला भेट दिली, मात्र २९ सप्टेंबर रोजी त्यांनी स्वत:च आपण कोरोना पॉझिटीव्ही असल्याचे सांगितले आहे.

कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे १४ दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचं असतानाही कुमार यांनी पीडित कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापनाचा भंग त्यांनी केला आहे.

याप्रकरणी आमदार कुमार यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

लोकप्रतिनीधी, आमदार असतानाही कोरोना परिस्थितीचं गांभीर्य न बाळगता कुलदीप कुमार यांनी पीडित कुटुंबीयांस भेट दिली. तसेच, इतरही कार्यकर्त्यांमध्ये ते वावरल्याचे दिसून येते

Read in English