corona vaccination : आता वर्कप्लेसमध्येही मिळणार कोरोनाची लस; कोण असतील पात्र आणि कशी असेल प्रक्रिया, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 10:52 AM2021-04-08T10:52:37+5:302021-04-08T11:01:11+5:30

corona vaccination in India : देशातील कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आता खासगी कार्यालये तसेच इतर कामाच्या ठिकाणीही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली आहे.

देशातील कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आता खासगी कार्यालये तसेच इतर कामाच्या ठिकाणीही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार १ जानेवारी १९७७ पूर्वी जन्मलेले सर्व व्यक्तींना कोरोनाची लस घेता येणार आहे. दरम्यान, या लसीकरणासाठी कोण कोण पात्र असतील आणि लसीकरणाची प्रक्रिया कशी असेल, यासंबंधीच्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा....

कोण असतील पात्र? - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

केंद्र सरकारने काढलेल्या नोटिफिकेशननुसार पात्र नातेवाईंकांव्यक्तिरिक्त अन्य कुठल्याही व्यक्तीला वर्कप्लेसमध्ये असलेल्या कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरमधून कोरोनाची लस दिली जाणार नाही.

४५ ते ५९ वयोगटामधील आणि काही प्रमाणात ६५ वर्षांपर्यंतच्या वयोगटामधील बहुतांश लोक हे संघटित क्षेत्रात काम करतात. ते सरकारी किंवा खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत. या व्यक्तींना कोरोनाच्या लसीसाठी अन्य कुठल्या तरी ठिकाणी जाऊन रांग लावावी लागू नये, यासाठी सरकारने या प्रकारची व्यवस्था केली आहे.

११ एप्रिलपासून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या प्रकारची लसीकरण केंद्रे सुरू होणार आहेत. केंद्र सरकारने राज्यांशी संबंधित अधिकाऱ्यांशी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा करण्याची सूचना दिली आहे.

याचं उत्तर नाही असं आहे. लसीकरण केंद्रासाठी वर्कप्लेसवर किमान १०० असे लोक असणे आवश्यक आहे जे लस घेण्यासाठी पात्र आणि इच्छुक असतील. लस वाया जाऊ नये म्हणून हा नियम करण्यात आला आहे.

कुठल्याही सरकारी कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू करताना ते जवळच्या सरकारी रुग्णालयाशी आणि खासगी कार्यालयातील सेंटर जवळच्या खासगी रुग्णालयाशी टॅग केले जाईल. सरकारी मान्यता असलेली ही रुग्णालये जवळच्या कार्यालयांना लसीकरणासाठी आपली टीम आणि प्लॅन देतील.

जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हा मॅजिस्ट्रेट आणि शहरी भागात टास्क फोर्सचे अध्यक्षपद नगरनिगम आयुक्त भूषवतील. ज्या वर्कप्लेसवर सेंटर उघडण्यात येतील तिथे मॅनेजमेंट एका अधिकाऱ्याला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करेल. जो प्रशासनासोबत कोऑर्डिनेशन करेल.

कुणाला आणि आणि कधी लस दिली जाईल. आयटी किंवा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता कशी आहे, आदींची देखरेख करण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्याची असेल.

लाभार्थी CoWIN प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करू शकतील. नोडल अधिकारी पूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवणार आहेत. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ऑन द स्पॉट सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.

हो, अशा सर्व वर्कप्लेसचे CoWIN प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करण्यात येईल. स्पष्टतेसाठी वर्कप्लेसचे नाव संशिप्त स्वरूपात लिहिले जाणार नाही. व्हॅक्सिनेशन साईटवर तीन भाग असतील. वेटिंग, व्हॅक्सिनेशन आणि ऑब्झर्व्हेशन रूम. हा रूम पर्मनंट स्ट्रक्चरमध्ये असेल. मात्र टेंट आणि शामियाना असलेले सेंटर मंजूर करण्यात आलेले नाहीत.