Corona Vaccination: कोव्हिशिल्ड कोणी घ्यावी, कोव्हॅक्सिन कोणासाठी चांगली? जाणून घ्या काय म्हणतात डॉक्टर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:16 PM2021-05-20T16:16:46+5:302021-05-20T16:23:38+5:30

how to choose Vaccine? Covishield or Covaxin for you: अनेकांना सीरमची कोव्हिशिल्ड (Covishield) हवी आहे, तर काहींना कोव्हॅक्सिन (Covaxin). परंतू कोव्हिशिल्ड कोणी घ्यावी आणि कोव्हॅक्सन कोणी घ्यावी यावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे, ते आपण पाहुया.

देशात सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Corona Virus Second Wave) हळूहळू कमी होऊ लागली आहे. एकीकडे लाट तर दुसरीकडे कोरोना लसीबाबत वाढलेली जागरुकता, यामुळे आज प्रत्येकाला कोरोना लस घ्यायची आहे. लसींचे काही साईड इफेक्टही आहेत, याचबरोबर त्याचे फायदेही आहेत. (Wich Vaccine is best? Covishield or Covaxin? how to choose, know from doctors.)

यामुळे लोक लस कुठे मिळेल, साठा आला का यापासून लसीचा स्लॉट बुक करण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. अनेकांना सीरमची कोव्हिशिल्ड (Covishield) हवी आहे, तर काहींना कोव्हॅक्सिन (Covaxin). परंतू कोव्हिशिल्ड कोणी घ्यावी आणि कोव्हॅक्सन कोणी घ्यावी यावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे, ते आपण पाहुया.

अनेकदा तुमच्या शहरात कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे, परंतू कोव्हिशिल्ड (पहिला डोस) हवी असल्याने उपलब्ध लस घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

यामुळे अनेकांच्या मनात कोणती लस घ्यावी, कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन असा प्रश्न उभा राहिलेला आहे. यावर डॉक्टरांनी कोणी कोणत्या लसीची निवड करावी याचे मार्गदर्शन केले आहे.

लसीकरणाला उशीर करण्याचे एक कारण हे आहे की, काही लोक या लसी पेक्षा ती लस चांगली, असे सांगत फिरत आहेत. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. तर सीरम इन्स्टीट्यूटने कोव्हिशिल्ड या ब्रिटनच्या लसीचे उत्पादन केले आहे.

महत्वाची बाब म्हणजे दोन्ही लसी WHO च्या मानकांमध्ये खऱ्या ठरल्या आहेत. दोन्ही लसी कोरोनापासून बचाव करण्यास तेवढ्याच परिणामकारक आहेत.

मेदांता मेडिसिटीचे प्रमुख डॉ. सुशीला कटारिया यांनी TOI ला मुलाखत दिली आहे. यामध्य़े त्यांनी कोणी कोणती लस निवडावी याबाबत सांगितले आहे. सध्या लसीच्या ब्रँडची निवड करण्याची वेळ नाहीय. लसीकरणाला महत्व द्यायला हवे.

18 ते 45 वयोगटातील लोकांमध्ये कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या तुलनेत जास्त साईडइफेक्ट दिसून येत आहेत. कोव्हिशिल्ड ही इम्यूनोजेनिक प्रतिक्रिया (immunogenic response) दाखवत असल्याने त्याचे साईड इफेक्टही जास्त आहेत. यामुळे तरुणांनी ही लस टाळून कोव्हॅक्सिन घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमजोर आहे त्यांनी कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड घ्यावी. कारण कोव्हिशिल्डचा दुसरा डोस जास्त अँटीबॉडी तयार करतो.

डॉ. कटारिया यांच्यानुसार जे वृद्ध आहेत आणि जे रक्त पातळ करण्याची औषधे (Blood-thinning medicins) घेतात त्यांनी Covaxin घेऊ नये असा सल्ला देण्यात येत आहे.

कोव्हिशिल्ड सामान्यपणे वयोवृद्ध किंवा गंभीर आजाराच्या लोकांना दिली जात आहे. तसेच काही रिपोर्टनुसार ज्यांना अॅलर्जी, ताप किंवा रोगप्रतिकारक शक्तीशी जोडलेली कोणतेही औषध सुरु आहे त्यांना कोव्हॅक्सिन न घेण्यास सांगितले जाते.