Corona vaccine : कोविशिल्ड सर्वात स्वस्त, तर या कंपनीची लस सर्वात महाग, सरकारने सांगितली किंमत

By बाळकृष्ण परब | Published: January 12, 2021 10:19 PM2021-01-12T22:19:50+5:302021-01-12T22:34:17+5:30

Corona vaccine Price Update : सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव हळूहळू कमी होत असतानाच कोरोनाविरोधातील लसीकरणालाही सुरुवात होणार आहे. सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे.

कोविशिल्ड - Marathi News | कोविशिल्ड | Latest national Photos at Lokmat.com

सरकारने सांगितले की, भारत सरकारने सिरम इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित होत असलेल्या कोविशिल्डच्या १ कोटी १० लाख डोसांची ऑर्डर दिली आहे. या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २०० रुपये (कर वगळून) असेल.

कोव्हॅक्सिन - Marathi News | कोव्हॅक्सिन | Latest national Photos at Lokmat.com

सरकारने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या ३८ लाख डोसची ऑर्डर दिली आहे. यापैकी १२ लाख डोस भारत सरकारला मोफत मिळणार आहेत. अशा परिस्थितीत या लसीच्या डोसची सरासरी किंमत ही २०६ रुपये (कर वगळून) एवढी असणार आहे.

फायझर-बायोएनटेक - Marathi News | फायझर-बायोएनटेक | Latest national Photos at Lokmat.com

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, फायझर आणि बायोएनटेकच्या लसीच्या एका डोसची किंमत १४३१ रुपये एवढी आहे.

मॉडर्ना - Marathi News | मॉडर्ना | Latest national Photos at Lokmat.com

मॉडर्नाच्या कोरोना लसीची संभाव्य किंमत २ हजार ३४८ रुपये ते २ हजार ७१५ रुपयांपर्यंत एवढी राहणार आहे.

चीनमधील लस - Marathi News | चीनमधील लस | Latest national Photos at Lokmat.com

चीनमध्ये विकसित झालेल्या कोरोनावरील लसीसाठी पाच हजार ६०० रुपयांहून अधिक राहणार आहे.

कोरोनावरील लसींच्या या किमती सरकारसाठी आहेत. लस विकसित करणाऱ्या कंपन्यांकडून या किमतीला या लसी सरकार खरेदी करणार आहे. १६ जानेवारीपासून देशात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होणार आहे.