corona vaccine will reach to delhi on 28th december
Corona Vaccine: देशात कधी येणार कोरोनाची पहिली लस?; तारीख ठरली By कुणाल गवाणकर | Published: December 22, 2020 03:37 PM2020-12-22T15:37:38+5:302020-12-22T15:40:38+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटींच्या पुढे गेला आहे. दिवाळीनंतर दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. काल दिवसभरात देशात २० हजारपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही लसीची गरज आहे. ही लस देशाला कधी मिळणार याचं उत्तर मिळालं आहे. २८ डिसेंबरला दिल्लीत कोरोना लसीची पहिली खेप देशात येईल. त्यामुळे जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू होऊ शकतं. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वीच याबद्दलची माहिती दिली होती. २८ डिसेंबरला कोरोना लसीची पहिली खेप भारतात येईल अशी माहिती दिल्ली विमानतळाचे सीईओ विदेह कुमार जयपुरिया यांनी दिली. सध्या देशात काही लसी संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहेत. यात कोविशील्ड लस सर्वात आघाडीवर आहे. लसीकरणास विलंब होऊ नये म्हणून केंद्रानं चार महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. राज्य. जिल्हा, ब्लॉक पातळीवर टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २६० जिल्ह्यांमधील २० हजारहून अधिक जणांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्याच आलं आहे. केंद्रानं को-विन नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्या माध्यमातून कोरोना लसींच्या वितरणाचं रिअल टाईम मॉनिटरिंग करण्यात येईल. को-विनचं मोबाईल ऍपदेखील तयार करण्यात आलं आहे. को-विनच्या माध्यमातून कोरोना लसीचं लोकेशन आणि तिचं तापमान यांची माहिती मिळेल. संभाव्य लाभार्थ्याला लसीचा दुसरा डोज मिळून सर्टिफिकेट मिळेपर्यंत को-विनच्या मॉनिटरिंग केलं जाईल.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus