भारतात आढळला कोरोनाचा नवीन AY.1 व्हेरिएंट; पुन्हा चिंता वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:40 PM2021-06-16T12:40:56+5:302021-06-16T12:51:12+5:30Join usJoin usNext corona virus : हा व्हेरिएंट आता हळूहळू भारतासह अनेक देशांमध्ये पसरत आहे. भारतात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने (B.1.617.2) पुन्हा एकदा आपले रूप बदलले आहे. हे नवीन व्हेरिएंट B.1.617.2.1 आहे, ज्याचे नाव 'AY.1' असे देण्यात आले आहे. हा व्हेरिएंट आता हळूहळू भारतासह अनेक देशांमध्ये पसरत आहे. सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्त्रज्ञ म्हणतात की, AY.1 व्हेरिएंटमध्ये इम्यूनपासून लपविण्याचे गुणधर्म आहेत. शरीराचे इम्यून रिस्पॉन्स, वॅक्सिन आणि अँटीबॉडी थेरपीमध्ये व्यत्यय आणून ते अंशतः किंवा पूर्णपणे रोगजनक बनवू शकते. आतापर्यंत जगभरात या व्हेरिएंटचे 156 नमुने नोंदवले गेले आहेत. त्याचा पहिला नमुना मार्चमध्ये युरोपमध्ये सापडला. भारतात प्रथमच हा व्हेरिएंट एप्रिल महिन्यात उघडकीस आला. GISAID वर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात सात नमुने सापडले आहेत. भारतात सापडलेल्या या नमुन्यांपैकी तीन नमुने तामिळनाडू आणि उर्वरित प्रत्येकी ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये AY.1 चे या म्यूटेशनची ओळख K417N नावाने करण्यात आली आहे. हे म्यूटेशन ब्राझीलमध्ये आढळलेल्या बीटा व्हेरिएंट (B.1.351) मध्ये देखील होते. IGIB चे वैज्ञानिक विनोद स्कारिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हा बदलता व्हेरिएंट समजून घेणे फार महत्वाचे आहे. मोठ्या प्रमाणात नवीन म्यूटेशनच्या माध्यमातून व्हायरसने पसरण्यास आणि इम्युनपासून बचाव करण्यास प्रयत्न करत आहे. यूकेची सरकारी एजन्सी पब्लिक हेल्थ इंग्लंड देखील K417N म्यूटेशनवर नजर ठेवून आहे. आतापर्यंत या व्हेरिएंटची किमान 35 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील दोन रुग्णांना या लसीचे दोन्ही डोस मिळाले होते. परंतु, त्यापैकी कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. IGIB च्या संशोधकांच्या मते, आकडेवारीवरून असे सूचित केले आहे की, AY.1 व्हेरिएंटपासून संक्रमित लोकांचे दोन वेग-वेगळे गट आधीपासूनच आहेत. स्पाइक म्युटेशन A222V असलेला एक छोटा गट अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील आहे. दुसरा गट मोठा आहे, ज्यात यूके, भारत आणि नेपाळसह इतर आठ देशांमध्ये स्पाइक प्रोटीन म्यूटेशन T95I आहे. IGIB चे संशोधक बानी जॉली यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मोठा (T95I) क्लस्टरला पाहता असे वाटते की, AY.1 अनेकदा स्वतंत्रपणे उत्पन्न झाला आहे आणि ज्या देशांमध्ये जीनोमिक सर्विलांसची सुविधा सीमित आहे, तेथे जास्त पसरू शकतो." जॉली म्हणाले, 'K417N मध्ये व्हायरसची वाढण्याची क्षमता आहे, जी इम्यून सिस्टमपासून बचाव करण्यास माहिर आहे. व्हेरिएंट ऑफ कंसर्न डेल्टा पाहता इतर कोणत्याही उदयोन्मुख म्यूटेशनकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.' तसेच स्कारिया म्हणाले की, व्हायरसचे हे म्यूटेशन मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीला देखील बाधित करू शकते. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्हाला अद्याप याबद्दल फारसे माहिती नाही आणि त्याचा अभ्यास करीत आहोत. त्यात भारतातील प्रकरणांचादेखील समावेश आहे.'टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसcorona virusCorona vaccine