Corona Virus News : अरे व्वा! कोरोना टेस्टपासून सुटका होणार?, आवाजावरून संसर्ग झाल्याचं समजणार; जाणून घ्या, कसं By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:57 AM 2022-09-06T11:57:03+5:30 2022-09-06T12:23:23+5:30
Corona Virus News : कोरोना चाचणीपासून आता सुटका होण्याची शक्यता आहे. फक्त आवाजावरून तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे का? हे समजणार आहे. यासाठी एक स्मार्टफोन App विकसित करण्यात आले आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,417 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 5,28,030 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळले नाही. त्यामुळे अजूनही भारतासह अनेक देशांमध्ये लोकांना सावधान राहण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रवासादरम्यान किंवा इतर काही ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. पण अनेकांना कोरोना चाचणी करण्यास आवडत नाही. तर काहींना त्याची खूप भीती वाटते.
कोरोना चाचणी म्हटली तर अनेकांना धडकी भरते. पण आता यामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो. कोरोना चाचणीपासून आता सुटका होण्याची शक्यता आहे. फक्त आवाजावरून तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे का? हे समजणार आहे. यासाठी एक स्मार्टफोन App विकसित करण्यात आले आहे.
स्मार्टफोन App च्या मदतीने तुमच्या आवाजाचा नमुना घेऊन तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे समजणार आहे. ही कोविड चाचणी आर्टिफिशियस इंटेलिजेन्स म्हणजे AI च्या मदतीने होणार आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे App अँटीजेन चाचणीपेक्षा अधिक अचूक आहे. त्याशिवाय ही चाचणी अधिक स्वस्त दरात होईल. त्याचा वापरही अधिक सहजपणे केला जाऊ शकतो. ज्या ठिकाणी PCR चाचणी करणे महाग आहे, अथवा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे, अशा ठिकाणी हे App मोठे फायदेशीर ठरणार आहे.
नेदरलँड्समधील Maastricht University मधील इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सचे संशोधक Wafaa Aljbawi यांनी सांगितले की, फाइन-ट्यून्ड AI अल्गोरिदमच्या मदतीने कोणाला कोरोना झाला आहे, याची माहिती मिळू शकेल. कोरोनाबाबत रिसर्चमधून नवनवीन माहिती सातत्याने समोर येत आहे.
एका संशोधकानुसार, यामध्ये रिमोट आणि व्हर्च्युअल चाचणीदेखील केली जाऊ शकते. ही चाचणी करण्यासाठी एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. या App द्वारे होणाऱ्या चाचणीचा वापर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वारावर केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.
कोरोना महासाथीच्या आजाराचा परिणाम लोकांच्या आवाजावरदेखील होतो. कोरोनाबाधित लोकांच्या आवाजात किंचित बदल होतो. त्यावरून संशोधक Wafaa Aljbawi आणि त्यांच्या सहकाऱ्याला AI च्या मदतीने व्हॉइस एनालाइज करून कोरोना चाचणी करणारे App तयार करण्याची कल्पना सुचली.
संशोधक त्यासाठी Mel-spectrogram एनालिसिस तंत्राचा वापर करतात. यामुळे लाउडनेस, पॉवर आणि व्हेरिएशनमुळे आवाजातील बदल दिसून येतो. सध्या App ने केम्ब्रिज विद्यापीठातून ऑडिओ सॅम्पल जमा गेले आहेत. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.