Corona Peak In India: भारतात रोज 10 लाख रुग्ण! जाणून घ्या, कसा असेल पीक? काय असतील धोके? देश आणि जगातील तज्ज्ञ चिंतित By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 02:14 PM 2022-01-08T14:14:38+5:30 2022-01-08T14:34:35+5:30
सध्या देशात सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. आता या लाटेचा पीक आल्यानंतर देशात 24 तासांत किती रुग्ण आढळू शकतात? यासंदर्भात जगभरातील संस्था आणि तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. भारतात दिवसेंदिवस ज्या प्रकारे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, ते पाहता तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. Omicron Wave सुरू झाल्यानंतर सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. आता या लाटेचा पीक आल्यानंतर देशात 24 तासांत किती रुग्ण आढळू शकतात? यासंदर्भात जगभरातील संस्था आणि तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. (Corona Omicron peak)
अमेरिकेतील एका आरोग्य तज्ज्ञाने आपल्या संशोधनात म्हटले आहे की, भारतात सुरू असलेल्या कोरोनाच्या या लाटेचा पीक पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये येईल. या काळात देशात रोज ५ लाख रुग्ण आढळतील.
देशीतील IIS ने तर देशात रोज 10 लाख रुग्ण आढळतील, असा भयावह अंदाज वर्तवला आहे. तसेच आयआयटी कानपूरच्या मते, जानेवारी महिन्यातच ही लाट शिखर खाठेल आणि रोज सुमारे 4-8 लाख रुग्ण आढळतील, असे म्हटले आहे.
परदेशातील वैज्ञानिकांचा अंदाज - एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, वॉशिंग्टनमधील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्होल्यूशन (IHME)चे संचालक डॉ ख्रिस्तोफर मुर्रे यांनी म्हाटले अहे की, "जगातील अनेक देशांप्रमाणे भारतही ओमायक्रॉनच्या लाटेत प्रवेश करत आहे. जेव्हा ही लाट पीकवर असेल, तेव्हा गेल्या वर्षीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही अधिक रुग्ण समोर येतील. मात्र याचवेळी, ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी हानिकारक आहे, असेही ते म्हणाले.
फेब्रुवारीमध्ये पीक, रोज 5 लाख केसेस - ओमायक्रॉन वेव्हसंदर्भात अंदाज वर्तवताना डॉ ख्रिस्तोफर म्हणाले, "नव्या रुग्ण संख्येच्या बाबतीत विक्रम होत आहेत. मात्र, आजाराच्या परिणामांसंदर्भात बोलायचे झाल्यास तो कमी धोकादायक आहे." वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे हेल्थ मेट्रिक्स सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. ख्रिस्तोफर म्हणाले की, ते संपूर्ण डेटा नंतर जाहीर करतील, मात्र, महत्वाची गोष्ट म्हणजे, भारतात पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये या लाटेचा पीक यायला हवा. या दरम्यान रोज 5 लाख रुग्ण आढळतील.
भारतात ओमायक्रॉन कमी घात असेल? - भारतात हायब्रिड इम्यूनिटी विकसित झाल्याने ओमायक्रॉन कमी धोकादायक ठरेल का? या प्रश्नावर दक्षिण आफ्रिकेचे उदाहरण देताना ख्रिस्तोफर म्हणाले, तेथे डेल्टा आणि बीटा या दोन्ही प्रकारांचा संसर्ग अधिक होता. यानंतर, लसीपासूनही रोगप्रतिकारशक्ती मिळते. यामुळे आजाराला बळी पडूनही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मृत्यू देखील कमी आहेत. यामुळेच आमचा अंदाज आहे, की भारतात ओमायक्रॉन बाधितांची संख्या मोठी असेल, पण डेल्टा वेव्हच्या तुलनेत हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू कमी असतील.
याच बरोबर, 85.02 ट्क्के रुग्णांत तर संक्रमणाची लक्षणेच दिसत नाहीत. मागच्या लाटेच्या तुलनेत ओमायक्रॉन 90 ते 95 टक्के कमी घात आहे. मात्र, वृद्धांनी यापासून सतर्क रहायला हवे, असेही मुर्रे यांनी म्हटले आहे.
जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट उच्चांक गाठेल - भारतीय वैज्ञानिक संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्था बंगळुरूतील वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की भारतात जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट उच्चांक गाठेल. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लाट ओसरण्यास सुरुवात होईल.
IIS ने 10 लाख केस रोजाना का किया अनुमान - IIS ने म्हटले आहे की, कोरोना पीकवर असताना रोज 3 लाख, 6 लाख किंवा 10 लाख केसेस येऊ शकतात. जर गृहीत धरले की, केवळ 30 टक्के लोकच सहजपणे कोरोनाच्या विळख्यात येऊ शकतात, तर अशा स्थितीतही ही संख्या कोरोनाच्या दुसर्या लाटेतील प्रकरणांच्या तुलनेत कमी असेल.
आज 1.42 लाख केसेस - भारतात शनिवारी कोरोनाचे एक लाख बेचाळीस हजार नवे कोरोना रुग्ण आढलून आले आहेत. कालच्या तुलनेत ही संख्या 21 टक्क्यांनी अधिक आहे. काल भारतात एक लाख 17 हजार रुग्ण नोंदवले गेले होते. (सर्व फोटो - प्रतिकात्मक)