corona virus vaccine reaches varanasi today carelessness surfaces during its transportation
मोदींच्या मतदारसंघात लस नेताना जे घडलं ते पाहून डोक्यावर हात माराल! By कुणाल गवाणकर | Published: January 13, 2021 08:58 PM2021-01-13T20:58:32+5:302021-01-13T21:05:05+5:30Join usJoin usNext देशात पुढील काही दिवसांत कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पुण्यात तयार करण्यात आलेली कोविशील्ड देशभरात पाठवण्यात आली. सीरमनं देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना लस पाठवली आहे. कोरोनाची लसीची वाहतूक करताना, तिची साठवणूक करत असताना विशिष्ट तापमान राखणं गरजेचं असतं. कोरोना लसीची वाहतूक करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत धक्कादायक प्रकार घडला. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आज दुपारी कोरोना लसीची पहिली बॅच पोहोचली. ही बॅच विस्तारा एअरलाईन्सच्या माध्यमातून वाराणसीत आणली गेली. विस्तारा एअरलाईन्सनं कोरोना लसीचे १६ खोके वाराणसीत पोहोचले. यामध्ये १४ जिल्ह्यांसाठी १ लाख ८५ हजार डोस आहेत. मात्र कोरोना लसी पोहोचवत असताना मोठा हलगर्जीपणा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना लसीची वाहतूक करणाऱ्या वाहनाचं फिटनेस २००६ मध्येच संपलं असल्याची माहिती आरटीओच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. UP ६५ AG ००२१ क्रमांक असलेलं वाहन साडे सोळा वर्षे जुनं आहे. त्याच्या फिटनेसची वैधता १२ मे २००६ पर्यंत होती. त्यामुळे फिटनेसची वैधता आता जवळपास साडे पंधरा वर्षे उलटली आहेत. कोरोना लसींची वाहतूक करणारी वाहनं सुस्थितीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोना लसी विशिष्ट तापमानात ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्यांची वाहतूक करणारी वाहनं खराब झाल्यास त्याचा थेट परिणाम लसीवर होऊ शकतो. कोरोना लसी कमीतकमी वेळेत आरोग्य केंद्रात पोहोचणं आवश्यक असतं. त्यामुळे कोरोना लसींच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनं चांगल्या स्थितीत असायला हवीत. याआधी गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन देशात पार पडलं. त्यावेळीही वाराणसीत लसीच्या वाहतुकीदरम्यान निष्काळजीपणा दिसून आला होता.टॅग्स :कोरोनाची लसनरेंद्र मोदीCorona vaccineNarendra Modi