CoronaVirus 26 percent out of total world corona cases found in india in last one week
CoronaVirus News: भारत कोरोनाचं नवं केंद्र?; धडकी भरवणारी, काळजी वाढवणारी आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:48 PM2020-08-25T15:48:49+5:302020-08-25T15:53:28+5:30Join usJoin usNext भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारी अतिशय वेगानं वाढत आहे. कोरोनाचा फैलाव आणि रुग्णांची वाढत असलेली संख्या हादरवून टाकणारी आहे. भारत कोरोनाचं नवं केंद्र झाल्याची शक्यता आकडेवारीवरून व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३१ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत देश जगात तिसऱ्या स्थानी आहे. भारतापुढे केवळ अमेरिका आणि ब्राझील हे दोनच देश आहेत. गेल्या आठवड्याभरात जगात सापडलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण एकट्या भारतात आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. वर्ल्डोमीटरनं दिलेल्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटी ३८ लाखांच्या पुढे गेला आहे. यापैकी ८ लाख १७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ कोटी ६३ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या व्यक्तींची संख्या ६६ लाखांपेक्षा जास्त आहे. २४ ऑगस्टला जगात कोरोनाचे २ लाख १३ हजार रुग्ण आढळले. या दिवशी भारतात ५९ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. २३ ऑगस्टला जगात २ लाख १० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्या दिवशी भारतात सापडलेल्या कोरोना बाधितांची संख्या ६१ हजार इतकी होती. २२ ऑगस्टला जगभरात २ लाख ६२ हजार कोरोना रुग्ण सापडले. त्यात भारतीयांचा आकडा ७० हजार इतका होता. २१ ऑगस्टला जगात २ लाख ५८ हजार रुग्णांची नोंद झाली. त्यातले ६९ हजार रुग्ण एकट्या भारतातले होते. २० ऑगस्टला जगभरात २ लाख ६७ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यातील भारतीयांची संख्या ६८ हजार होती.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus