coronavirus: चिंताजनक! कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव; काही राज्यांत शहरांपेक्षा गावात अधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:43 PM2020-06-05T12:43:33+5:302020-06-05T13:16:35+5:30

लॉकडाऊननंतर रोजगार गेल्याने शहरांमधील मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. मात्र ह्या स्थलांतरानंतर ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे.

देशात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनत चालली आहे. दोन अडीच महिन्यांपूर्वी भारतात कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये आढळत होते. मात्र आता शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रकोप ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे.

राजस्थानमध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण - Marathi News | राजस्थानमध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण | Latest national Photos at Lokmat.com

राजस्थानसारख्या राज्यात स्थलांतरित मजुरांच्या आगमनानंतर नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून येऊ लागला आहे. पण हे चित्र केवळ राजस्थानपुरते मर्यादित नाही.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव - Marathi News | महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव | Latest national Photos at Lokmat.com

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला तरी येथील कोरोनाचे बहुतांश रुग्ण हे शहरी भागात मर्यादित होते. ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या मर्यादित होती. मात्र आता ग्रामीण भागातही शहरी किंवा निमशहरी भागांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

ओदिशातही स्थलांतरीतांच्या आगमनानंतर चित्र बिघडले - Marathi News | ओदिशातही स्थलांतरीतांच्या आगमनानंतर चित्र बिघडले | Latest national Photos at Lokmat.com

ओदिशामध्ये आतापर्यंत 4.5 लाख स्थलांतरित मजूर पोहोचले आहेत. दरम्यान, सध्या सापडत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येथील गंजम जिल्ह्यात दोन मेपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र आता तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या ४९९ वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ७० टक्के स्थलांतरीत - Marathi News | उत्तर प्रदेशातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ७० टक्के स्थलांतरीत | Latest national Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेशात सुमारे ३० लाख स्थलांतरित मजूर दाखल झाले आहेत. त्यासोबत कोरोनाचा संसर्गही पोहोचला आहे. त्यामुळे बस्ती, अमेठीसारख्या छोट्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. २ जूनपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३३२४ कोरोनाचे अँक्टिव्ह रुग्ण होते. त्यापैकी ७० टक्के रुग्ण हे प्रवासी मजूर आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये महिनाभरापूर्वीपर्यंत कोरोनाचे सुमारे ९० टक्के रुग्ण शहरी भागात सापडत होते. मात्र आता ग्रामीण भागातून कोरोनाबाधित समोर येण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. स्थलांतरित मजुरांमुळे हे प्रमाण वाढल्याचा दावा अधिकारी करत आहेत.

दरम्यान, देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. आता रोज आठ ते नऊ हजार नवे रुग्ण सापडत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान अधिकच खडतर झाले आहे.