coronavirus: भारतात कोरोनाचे होतेय ‘लॉकडाऊन’ अनेक राज्यांमधून आली दिलासा देणारी बातमी By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 11:28 AM 2020-07-15T11:28:50+5:30 2020-07-15T11:39:32+5:30
देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे. तसेच देशातील कोरोनाचा फैलाव आता केवळ काही राज्यांपुरता मर्यादित झाला आहे, कंटेन्मेंट झोनबाबत जो निर्णय घेण्यात आला तो यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे, असे केंद्र सरकारने सांगितले. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकार आणि आरोग्य यंत्रणेला हळुहळू यश मिळत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे. तसेच देशातील कोरोनाचा फैलाव आता केवळ काही राज्यांपुरता मर्यादित झाला आहे, कंटेन्मेंट झोनबाबत जो निर्णय घेण्यात आला तो यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे, असे केंद्र सरकारने सांगितले.
मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात देशात ३ लाख ११ हजार ५६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पाच लाख ७१ हजार ४५९ जणांना कोरोनावर मात केली आहे, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत रिकव्हर झालेल्या रुग्णांची संख्या १.८ टक्क्यांहून अधिक झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३ मे रोजी देशातील रिकव्हरी रेट २६.५९ टक्के होता. तर आता हा रिकव्हरी रेट ६३.०२ टक्के झाला आहे.
२० राज्ये/केंद्रशासित प्रदेशात रिकव्हरी रेट अधिक केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या सरासरीत लडाख अव्वलस्थानी आहे. तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
केवळ दोन राज्यांत ५० टक्क्यांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्याच्या आकडेवारीनुसार देशातील ८६ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. मात्र त्यामध्येही केवळ महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांत ५० टक्क्यांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये होताहेत कमी चाचण्या कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवणे महत्त्वाचे आहे. देशात दर दहा लाख लोकसंख्येमागे होत असलेल्या चाचण्यांचा विचार केल्यास गोव्यामध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे एक हजार ५८ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. तर दिल्लमीमध्ये दर दहा लाख लोकांमागे ९७८ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. संपूर्ण देशाचा विचार केल्यास दर दहा लाख लोकांमागे २०१ चाचण्या केल्या जात आहेत. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कमी चाचण्या होत आहेत.
नव्या रुग्णांच्या वाढीचा दर मंदावला दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दैनंदिन दर घटत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. सोमवारी देशात कोरोनाचे २९ हजार ४९८ रुग्ण सापडले होते. तसेच देशातील एकूण रुग्णांची संख्या नऊ लाखांच्या पुढे गेली आहे.
सध्या ३.२४ टक्के दराने वाधताहेत कोरोनाचे रुग्ण मार्च महिन्यामध्ये देशातील कोराना रुग्णवाढीचा दैनंदिन दर ३१ टक्के होता. मे मध्ये वाढीचा हा दर घटून ९ टक्के झाला, तर मे अखेरीस तो ५ टक्क्यांवर आला. दरम्यान, १२ जुलैच्या आकडेवारीनुसार दैनंदिन रुग्णवाढीचा दर ३.२४ टक्के झाला आहे.
संसर्गाचा दर घटला आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाचा संसर्ग होण्याचा दर घटला आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर दर घटणे हे कोरोनाविरोधात करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांचे प्रतिबिंब आहे. तसेच तसेच अॅक्टिव्ह रुग्णांचे घटत असलेले प्रमाण हे संक्रमणाची गती कमी होत असल्याचे द्योतक आहे, असा दावा आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.