CoronaVirus: नवरी नटली; सुपारी फुटली अन् वराती मंडळींना ५० हजार दंडाची रक्कम भरावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 09:56 AM2020-07-07T09:56:23+5:302020-07-07T10:06:55+5:30

. परंतु प्रत्येक जण त्या अटींचं पालन करतंच असं नाही. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात एक लग्न झालं. पण हे लग्न म्हणजे कोरोनाला एक प्रकारचं निमंत्रणच होतं.

खरं तर कोरोनाच्या संकटापायी लग्न समारंभात ५० लोक सहभागी होऊ शकतात. तेसुद्धा पूर्ण प्रोटेक्शन म्हणजेच मास्क आणि हातमोजे वगैरे घालून सामील होण्याची अट आहे.

सर्वच पाहुण्या मंडळींना मास्क घालणं आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करावं लागणार होतं. परंतु लग्नात असं काहीच दिसलं नाही. अशातच प्रशासनानं वर आणि वधू दोघांच्या कुटुंबीयांनाही ५० हजारांचं दंड ठोठावला.

द हिंदूच्या रिपोर्टनुसार, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच ज्या गाडीतून वरात निघाली होती, ती कारसुद्धा क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

ओडिशातील गंजाम या जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यामुळे तिथं मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गजरेचं करण्यात आलं आहे.

स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांचा जीव धोका टाकू नये, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच या वरातीचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्या व्हिडीओमध्ये वराती मंडळी मास्क न घालता आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन न करता मज्जा लुटत आहेत. लोकांनी यावर प्रतिक्रिया देत हा प्रकार चुकीचं असल्याचं सांगितलं आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत ३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गंजाम जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २००० हजारांवर पोहोचली आहे.

Read in English