coronavirus : है तैय्यार हम... हल्ल्यात जखमी झालेल्या 'डॉक्टर' देशसेवेसाठी पुन्हा रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 06:17 PM2020-04-03T18:17:03+5:302020-04-03T19:25:40+5:30

इंदुरमध्ये आरोग्य विभागाची टीम येथील टाटपट्टी बाखलमध्ये काही महिलांची तपासणी करण्यासाठी पोहोचली असता, या टीमवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आले होते.

डॉ तृप्ती कटारिया आणि डॉ झाकिया सय्यद यांनी पुन्हा एकदा नव्या दमानं कोरोना व्हायरच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालय गाठले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशसेवेसाठी त्या पुन्हा सज्ज झाल्या आहेत.

इंदुरमधील टापट्टी बाखलमध्ये आरोग्य विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या २ महिला डॉक्टर पुन्हा देशसेवेसाठी रुग्णालयात रुजू झाल्या आहेत.

लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रदिवस काम करत आहेत. तर, वैद्यकीय क्षेत्र पायाला भिंगरी लावून नागरिक आणि रुग्णांच्या सेवेत गुंतले आहे. मात्र, या तातडीची सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि पोलिसांवरच हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

आरोग्य विभागाची एक टीम येथील वयस्कर महिलेला मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांचे बॅरिकेड सुद्धा तोडले आणि मेडिकल टीमला मारहाण करत त्यांच्यावर दगडफेक केली.

आम्ही त्याठिकाणी गेलो त्यावेळी जवळपास शंभर-दिडशे लोक अचानक आमच्या समोर आले आणि मारा-मारा म्हणून ओरडू लागले. त्यांनी आमच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.

जर आमच्या सोबत पोलीसांची टीम नसती तर त्या लोकांपासून बचाव करणं शक्यच नव्हतं असंही डॉक्टर तृप्ती यांनी सांगितलं.

या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कारवाई करत लोकांवर नियंत्रण मिळविले.

या इंदुर शहराला, जे संस्कारी, उच्चशिक्षित आणि नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं जातं, त्यास काय झालंय? असा प्रश्न सर्वांना पडलाय. कुणाची नजर लागलीय या शहराला, कुठल्या अफवांमध्ये तुम्ही अडकलाय. परमेश्वरासाठी तरी विचार करुन पाऊल टाका. डॉक्टर, पोलीस हे सर्व आपले मदतगार आहेत. जर, आपण त्यांची मदत केली, तरच उद्या वेळ आपल्याला मदतीला येईल, असे भावूक आवाहन डॉ. राहत इंदोरी यांनी केलं होतं.

इंदुरमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा भाजपा नेते आणि माजी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी निषेध केला आहे.